उद्योगोपयोगी ॲप : मेटा बिझनेस सुट

आपल्यापैकी अनेकांना एक ठराविक मर्यादेनंतर सोशल मीडिया हा सोसेनासा होतो. तेच ते लोकांचं हसणं, रडणं, फोटो, व्हिडीओ, पार्ट्या पाहून कंटाळा येतो. अशामध्ये हल्ली मार्केटिंगतज्ज्ञ सांगतात की धंदा वाढवायचा असेल, तर फेसबुकवर मार्केटिंग करा. एकीकडे सोशल मीडियाचा कंटाळा आणि दुसरीकडे तीच गरजसुद्धा. अशावेळी काय कराल?

या प्रश्नाचं उत्तर आहे ‘मेटा बिझनेस सुट’. हे ॲप फेसबुकनेच तयार केलं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या नियमित फेसबुक खात्याने लॉगीन करू शकता. या ॲपमध्ये सामान्य फेसबुकप्रमाणे मित्रांच्या वॉल, स्टेटस वगैरे काहीही दिसणार नाहीय; तर फक्त तुमच्या व्यवसायाचे पेज दिसेल व त्याचा उपयोग करता येईल.

मेटा बिझनेस सुट या एकाच ॲप मधूनतुम्ही फेसबुक पेज, इंस्ताग्राम बिझनेस अकाउंट तसेच फेसबुक ग्रुप्स manage करू शकता.

तुम्ही जर पेजव्यतिरिक्त स्वतःच्या वॉलवरून किंवा इतर ग्रुप्समध्ये जाऊन स्वतःची मार्केटिंग करताय, तर तुम्ही कुठे तरी चुकताय. तुमचं प्रोमोशन आणि तुमच्या ग्राहकांशी तुमचा संवाद हा ‘फेसबुक मार्केटिंग’च्या संकेतानुसार फक्त तुमच्या अधिकृत पेजवरूनच व्हायला हवा.

मेटा बिझनेस सुटवरून तुम्ही आपले पेज पूर्णपणे सांभाळू शकता. पोस्ट करू शकता. लोकांच्या अभिप्रायाला प्रतिसाद देऊ शकता. लोकांना तुमचे पेज लाइक करण्यासाठी निमंत्रित करू शकता. तर जरूर वापरून पाहा ‘मेटा बिझनेस सुट’.

– शैलेश राजपूत

The post उद्योगोपयोगी ॲप : मेटा बिझनेस सुट appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment