तुम्हीही या ‘रॅट रेस’मध्ये अडकला आहात का?

प्रसिद्ध अमेरिकन लेखक ‘रॉबर्ट कियोसाकी’ यांचे एक वाक्य आहे, ‘श्रीमंत लोक संपत्ती खरेदी करतात; मध्यमवर्गीय खर्च खरेदी आणि त्यालाच संपत्ती समजतात. सामान्य लोक खर्च कसे खरेदी करतात, त्याचे एक उदाहरण पहा, एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबावर सुरुवातीला कर्ज असते. आपला मुलगा मोठा होऊन कर्ज फेडेल या उद्देशाने त्याला शाळेत घातले जाते. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत कर्ज घेतले जाते.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी आणि पैशांसाठी तो कुठेतरी नोकरी करायला लागतो. कर्ज फेडून सर्व स्थिरस्थावर झाल्यानंतर तो मित्रांनी घेतला म्हणून फ्लॅट, नवी कार, आयफोन, एअर कंडिशनर इ. घेतो आणि आयुष्यभर त्यांचे हप्ते फेडत बसतो. जवळपास सगळीकडे हीच परिस्थिती असते. ही सायकल अव्याहतपणे चालू राहते. रॉबर्ट याला ‘रॅट रेस’ म्हणजेच उंदरांची शर्यत असे म्हणतात. रॅट रेसमधील व्यक्ती कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तसेच सरकारी कर भरण्यासाठीच आयुष्यभर कामे करतात.

या रॅट रेसमधून बाहेर पडण्यासाठी खर्च आणि संपत्ती यामधील फरक समजून घेणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला मिळालेलं आर्थिक स्वातंत्र्य याच समजुतीवर अवलंबून असते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास खर्च ही अशी गोष्ट असते, जी तुमच्या खिशातून सातत्याने पैसा बाहेर काढते आणि संपत्ती अशी गोष्ट असते, जी बाहेरून तुमच्या खिशात सातत्याने पैसा जमा करते. सर्वसामान्य लोक आगोदर खर्च करतात आणि राहिलेली रक्कम बचत करतात.

श्रीमंत लोक सर्वात आगोदर बचत व गुंतवणूक करतात आणि त्यानंतर राहिलेली रक्कम खर्च करतात. श्रीमंत लोक त्यांच्याकडे असलेल्या पैशाला कामाला लावतात आणि अधिकचा पैसा कमावतात; सामान्य लोक आपला वेळ विकतात आणि ठरलेल्या दरानुसारच पैसा कमावतात. जास्त पैसे कमवण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे आधीच खूप सारा पैसा असावा लागतो अशी कित्येक लोकांची समजूत असते, परंतु आजच्या काळात ही गोष्ट कालबाह्य झाली आहे.

– शेख रियाझ
7378926295

बिझनेस करण्यासाठी पैसाच लागतो, ही एक अंधश्रद्धा

The post तुम्हीही या ‘रॅट रेस’मध्ये अडकला आहात का? appeared first on स्मार्ट उद्योजक.