शतकवीर भारतीय कंपन्या

भारतातील सर्वात जुनी कंपनी कोणती किंवा ती कुणी स्थापन केली या प्रश्नाचे उत्तर थोडी शोधाशोध करून मिळेल, पण ते पूर्णपणे अचूक असेल हे मात्र सांगता येणार नाही. सर्वात जुना दाखला सापडतो १७३६ मधील. आत्ता आहे २०२२, म्हणजे तब्बल २८६ वर्षांपूर्वीचा! मग त्यापूर्वी उद्योगधंदे नव्हते कां? असतीलच, पण त्यांची कंपनी किंवा संस्था स्थापन झाली नसावी.

आपण पाहतो की अनेक कंपन्या मोठ्या उत्साहात सुरू होतात, पण काही काळानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बंद पडतात. स्अशा वेळी शंभर वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या कंपन्या तशा दुर्मिळच आणि सन्माननीय. इतकी वर्ष कंपनी केवळ चालवायची नाही, तर एका कंपनीने सुरुवात करून व्यवसायाचा विस्तार करायचा आणि कंपनीला सातासमुद्रापार न्यायचं म्हणजे जिद्द आणि दूरदृष्टी हवीच.

आजपासून आम्ही सुरू करत आहोत शंभर वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात असलेल्या कंपन्यांबद्दल माहिती देणारी लेखमाला.

 

 

 

 

 

The post शतकवीर भारतीय कंपन्या appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment