Ridhi Karan & Associates

स्मृतीचिन्ह, मानचिन्हाची ४५ वर्षांची परंपरा जपणारे ‘श्री प्रोसेस वर्क्स’

वर्ष २०१९. स्थळ कोल्हापूर. महापुरामुळे संपूर्ण शहर पाण्यात. अनेक व्यवसाय बुडाले. आठ ते दहा दिवस संपूर्ण आयुष्यभराची कमाई ७ फूट पाण्याखाली होती. आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता होती. व्यवसायाला वाढवण्यासाठी बँकेचं कर्ज डोक्यावर घेतले होते. ती मशिनरीची गुंतवणूक पाण्याखाली… खरं तर आभाळ कोसळले होते. सगळेच संपले आता, असा क्षण आयुष्यात आला आणि मग … Read more

नांदेड जिल्ह्यातील लघुउद्योजकांना शासनाकडून पुरस्कारासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड जिल्ह्यातील लघुउद्योजकांकडून सूक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या ‘उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार’ सन २०२१ या वर्षासाठी सोमवार २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. उद्योग संचालनालयाच्या वतीने सन १९८४ पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात. … Read more

मराठी राजभाषा दिनी जाणून घ्या ‘विद्युत वाहन क्षेत्रातील उद्योगांच्या संधी’

Business opportunities in Electric vehicle industry या २७ फेब्रुवारी रोजी ‘विद्युत वाहन क्षेत्रातील उद्योगांच्या संधी’ या विषयावर ‘EVC Finder’चे सहसंस्थापक अनुरंग डोरले तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. हे मार्गदर्शन व्हिडिओ कॉन्फरंसच्या माध्यमातून होणार असून सर्वांसाठी ते खुले आहे. ‘स्मार्ट उद्योजक’ या वेबिनारचे माध्यम प्रायोजक आहे. पेट्रोल, डिझेलचा जगभरातील तुटवडा आणि भाववाढ पाहता येणार काळ हा … Read more

‘आत्मनिर्भर भारता’साठी ‘एक स्थानक, एक उत्पादन’ योजना कार्यान्वित

देशभरातील रेल्वे स्थानकांवर देशी आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची आणि भारतीय कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसंबंधी दुकाने उभारून या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘एक स्थानक, एक उत्पादन’ या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही उत्पादने म्हणजे त्या त्या परिसराचे वैशिष्ट्य असतील आणि त्यामध्ये देशी जातीजमातींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, स्थानिक विणकरांनी विणलेली हातमागाची उत्पादने, जगप्रसिद्ध लाकडाच्या कोरीवकाम … Read more

MSME उद्योगांना उभारी देण्यासाठी ८०८ दशलक्ष डॉलर्सच्या निधीला मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSME) कामगिरीला उभारी आणि चालना देण्याच्या कार्यक्रमाला (आरएएमपी) मंजूरी देण्यात आली. या अंतर्गत, जागतिक बँकेच्या सहाय्याने, ८०८ दशलक्ष डॉलर्स निधी दिला जाणार आहे. आरएएमपी ही नवी योजना असून आर्थिक वर्ष २०२२-२३ पासून तिची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेसाठी एकूण ८०८ … Read more

स्टार्टअप्ससाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ने उपलब्ध केले नवे प्लॅटफॉर्म

मायक्रोसॉफ्ट या माहिती तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनीने भारतातील स्टार्टअप्ससाठी ‘Microsoft for Startups Founders Hub’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे. ३१ मार्च रोजी ‘मायक्रोसॉफ्ट’तर्फे याचे उदघाटन करण्यात आले. ‘मायक्रोसॉफ्ट’ने आपल्या प्रसिद्धिपत्रात म्हटले आहे की, या प्लॅटफॉर्मद्वारे स्टार्टअप्सना ३ लाख अमेरिकन डॉलर किमतीचे online resources तसेच तंत्रज्ञान उपल्बध करून दिले जात आहे. ज्यामध्ये ओपन सोर्स क्लाउड तसेच … Read more

कोविडच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी MSME क्षेत्रासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम

कोविड-१९ चा देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील लहान व्यवसायांवर होणारा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. काही उपक्रम पुढीलप्रमाणे : संकटातील एमएसएमईसाठी २० हजार कोटी रुपयांपर्यंत पूरक कर्ज. … Read more

शिक्षण व स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात मोठी उद्योगसंधी, या रविवारी ‘मेगा वेबिनार’

TezzDimag तर्फे तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी, निवृत्त या सर्वांसाठी उद्योगाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. याची माहिती देण्यासाठी ‘TezzDimag’चे संस्थापक कपिल शर्मा हे या रविवारी एक ‘मेगा वेबिनार’ घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षण क्षेत्रात काम करून महिना हजारो रुपये कमावण्याची इच्छा असलेल्यांनी जरूर या सेमिनारला उपस्थिती लावावी, असे आवाहन प्रवीण राठोड यांनी केले आहे. “Whole … Read more

टाटा पॉवर आणि अपोलो टायर्स एकत्र येऊन उभारणार EV चार्जिंग स्टेशन्स

‘डू ग्रीन’ प्रति असलेली आपली बांधिलकी जपणारी भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा कंपन्यांपैकी एक असलेली ‘टाटा पॉवर’ आणि भारतातील आघाडीची टायर उत्पादक कंपनी असलेल्या ‘अपोलो टायर्स लिमिटेड’ने भारतभरात सार्वजनिक चार्जिंग स्थानके उभारणीसाठी धोरणात्मक भागीदारी करत असल्याचे जाहीर केले आहे. ही चार्जिंग स्थानके देशभरात पसरलेल्या अपोलो टायर्सच्या व्यावसायिक आणि प्रवासी वाहन विभागांत असतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग … Read more