Ridhi Karan & Associates

शेतकऱ्यांनी कृषी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात : नितीन गडकरी

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन लाभदायी कृषी करावयाची असल्यास गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात केले. कृषी क्षेत्रात नव्याने येणारे तंत्रज्ञान आणि त्याच्या वापरातून शेतकऱ्यांनी रचलेल्या यशोगाथा तयार करून त्या इतर शेतकऱ्यांपर्यंत जाणे आवश्यक आहे. निर्यातीसाठी … Read more

भारत २०४७ पर्यंत जागतिक विकासाला चालना देणारे शक्तीस्थान बनेल : पियुष गोयल

भारत २०४७ पर्यंत जागतिक विकासाला चालना देणारे पॉवरहाऊस (शक्तीस्थान) बनण्याच्या मार्गावर आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले. अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियातल्या व्यावसायिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. आपल्या भाषणात गोयल म्हणाले की, इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क (IPEF) अर्थात भारत प्रशांत क्षेत्र आर्थिक आराखडा म्हणजे, नियमावर चालणारी आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था आणि पारदर्शक आर्थिक व्यवस्था … Read more

कृषीक्षेत्राला बळकटी आणण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र एकत्र

केंद्रीय कृषी मंत्रालय आणि ‘फिक्की’ यांच्या संयुक्त उपक्रमाचा प्रारंभ केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज नवी दिल्ली येथे कृषी क्षेत्रात खाजगी – सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर आधारित प्रकल्प व्यवस्थापन एककाचा आरंभ केला. यावेळी बोलताना तोमर यांनी कृषीक्षेत्राला बळकटी आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केले, त्यामुळे इतर क्षेत्रेही मजबूत होतील असे ते म्हणाले. खाजगी … Read more

कोणत्याही बँकेचे उंबरठे न झिजवता आता ‘मुद्रा’ कर्ज मिळणे शक्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ लघु आणि सूक्ष्म गटातील उद्योजकांसाठी मुद्रा योजना आणली. या योजनेअंतर्गत उद्योजकांना ₹५०,००० ते १०,००,००० पर्यंत व्यावसायिक कर्ज मिळू शकते म्हणून या योजनेबद्दल लघुउद्योजकांमध्ये उत्साह होता. परंतु प्रत्यक्ष योजना मिळवण्यामध्ये येणाऱ्या अडचणी पाहून उद्योजकांनी या योजनेकडे पाठ फिरवली. योजनेचा लाभ मिळवण्यातली सर्वात मोठी अडचण ही होती की योजनेची अमलबजावणी सर्वस्वी बँकांच्या … Read more

उद्योग मंत्री आणि हणमंतराव गायकवाड यांच्या उपस्थितीत ‘सॅटर्डे क्लब’चा ‘इंजिनिअर्स डे’

मराठी तरुणांना बिझनेस नेटवर्किंगसाठी राज्यव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ या संस्थेतर्फे भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १४ सप्टेंबर रोजी डोंबिवली येथे राज्यस्तरीय उद्योजकीय परिषद आयोजित केली आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, MSME, महाराष्ट्रचे संचालक पी.एम. पार्लेवार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. … Read more

उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांनी तेलबिया उत्पादनाकडे वळण्याची गरज : गडकरी

कृषी उत्पादन संस्थाचे काम महाराष्ट्रात उत्तम चालू आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटतो. आपली शक्तीस्थळे आणि आपल्या दुर्बल बाजू विचारात घेऊन पुढची वाटचाल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘ॲग्रोवन’ कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ज्ञानाचे संपत्तीमध्ये रुपांतर तसेच टाकाऊ वस्तूपासून संपत्तीनिर्मिती या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे मंत्री यावेळी म्हणाले. … Read more

१५ ऑगस्टपासून जिल्हा आणि तालुका पातळीवर सुरू आहे ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’

महाराष्ट्र सरकारने नवउद्यमी आणि तरुणांमधील संशोधन वृत्ती याला प्रोत्साहन देण्यासाठी १५ ऑगस्ट ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’ सुरू झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यक्रम होत असून. इथे स्टार्टअप्सची निवड आणि त्यांना प्रशिक्षण तसेच आवश्यक ती सरकारी मदत देण्यात येणार आहे. पुढील तीन महिने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात आणि प्रत्येक तालुक्यात ही यात्रा जाणार आहे. … Read more

चष्म्यासारखी गोष्ट ऑनलाइन खरेदी करता येऊ शकते; ही किमया करून दाखवणारा जादूगर

आयआयएम-बंगळुरूमध्ये व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना २००७ मध्ये त्यांनी व्हॅल्यो टेक्नॉलॉजीज अंतर्गत सर्च माय कॅंपस हे पहिले व्यावसायिक पोर्टल लाँच केले. या साइटचा उद्देश विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या निवास, पुस्तके, इंटर्नशिप, कार-पूल सुविधा, अर्ध वेळ नोकरी अशा विविध प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्याचा होता. त्याच्या लक्षात आलं की चष्मा उद्योग हा दुर्लक्षित उद्योगांपैकी एक आहे, ज्याचा तोपर्यंत … Read more

आता खाजगी कंपन्या वस्तू वितरणासाठी करू शकतात ड्रोनचा वापर

अर्थव्यवस्थेच्या बहुतांश सर्व क्षेत्रांना ड्रोनचे अनेक फायदे होऊ शकतात. यामध्ये कृषी, लस वितरण, देखरेख, शोध आणि बचाव, वाहतूक, मॅपिंग, संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. ६ जुलै २०२२ रोजी २३ पीएलआय लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली. लाभार्थ्यांमध्ये ड्रोनचे १२ उत्पादक आणि ड्रोनच्या सुट्या भागांचे ११ उत्पादक यांचा समावेश आहे. सरकार ड्रोन सेवा प्रदात्यांच्या … Read more

भारताने ७५ हजार मान्यताप्राप्त स्टार्टअप्सचा ओलांडला टप्पा

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) आतापर्यंत ७५ हजारहून अधिक स्टार्टअप्सना मान्यता दिली आहे. हा एक मैलाचा टप्पा असून स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना हा विशेष योग जुळून आला आहे; अशी माहिती केंेद्रीय वाणिज्य आणि उद्योग व्यवहार, अन्‍न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जाहीर केली. एकूण मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी, … Read more