दुबईमध्ये उद्योगाचा झेंडा फडकवत आहेत महाराष्ट्रातील या तीन उद्योजिका

या संकलनात तीन महिला उद्योजिकांच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातील दोन कथा ‘स्मार्ट उद्योजक’च्या ‘उद्योजक सूची’मध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यामुळे त्या स्वकथनात्मक आहेत. या महिला उद्योजिकांचा प्रवास आणि संघर्ष हा आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रेरणा देणारा आहे. – संपादक १. कोल्हापुरातली एक सामान्य तरुणी झाली दुबईची ‘बिझनेस अचिव्हर’ कोल्हापुरातली एक सामान्य तरुणी झाली दुबईची ‘बिझनेस अचिव्हर’ २. … Read more

आत्मविश्वास वाढवणासाठी करा या २० छोट्या छोट्या गोष्टी

आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर असलेला विश्वास. फुल जसे त्याच्या सुगंधाने ओळखले जाते तसेच आत्मविश्वासाचे असते. आत्मविश्वासाच्या अभावामुळे अनेकजण काळाच्या, जगाच्या मागे राहतात. कोणी कितीही हुशार असला तरी त्याची हुशारी आत्मविश्वासाशिवाय उपयोगी नाही. आत्मविश्वास हाच यशाचा पाया असतो असे म्हणणे चूक ठरणार नाही. आत्मविश्वासाच्या अभावाने माणसं स्वतःवरच संशय घेतात आणि नकारात्मक विचारांच्या आहारी जातात. आत्मविश्वास … Read more

तरुण उद्योजकांनी काळजी घ्याव्यात अशा सहा गोष्टी

तरुण वयात व्यावसायिक बीज रोवली गेली तर त्याचे दीर्घकालीन फायदे खूप होतात. कारण या वयात सुरू केलेले व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. मात्र तरुण वयात व्यवसाय करताना काही गोष्टींची कटाक्षाने काळजी घ्यावी लागते. अशा सहा महत्त्वाच्या गोष्टी खाली देत आहोत. १. तुमची व्यवसाय कल्पना व्यवहार्य आहे का? जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करता तेव्हा तुम्हाला तो … Read more

अपयशाने न डगमगता नव्याने उभा केला भारतातला पहिला युनिकॉर्न स्टार्टअप

ज्या काळात तरुणाई प्रत्येक नवीन सिनेमाचा पहिला शो बघायचाच या कल्पनेने पछाडलेली होती, तेव्हा एक युवक आपल्या तीन मित्रांबरोबर बसून टवाळक्या न करता एसएमएस सर्च इंजिनचा विचार करत होता. तो युवक उच्चशिक्षित होता, शिवाय त्याच्या परिवारातील सदस्यांनाही शिक्षणाबद्दल आस्था होती. या युवकाने आपल्या तीन मित्रांसह ‘इनमोबी’ हा भारताचा पहिला स्टार्टअप स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. … Read more

अनेक मानसिक त्रासांचा बळी पडू शकतो उद्योजक

व्यवसाय करायचे ठरवणे आणि तो प्रत्यक्ष सुरू करणे व चालवणे हे वाटते तितके सोपे नाही. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ७२ टक्के उद्योजकांना मानसिक स्वास्थ्यासंबंधीत विकार जडतायत. जसे की डिप्रेशन, Anxiety ADHD, bipolar सारखे आजार डोकं वर काढत आहेत. सध्या स्थितीत सोशल मीडियाचा प्रत्येक आयुष्यावर खूप जास्त प्रभाव आहे. उद्योजकसुद्धा याला अपवाद नाहीत. … Read more

स्वतःला ऑनलाइन शिक्षणाची आवड असणाऱ्या ‘बायजू’ने जगभरातल्या करोडो विद्यार्थ्यांना लावली ऑनलाइन शिक्षणाची गोडी

शाळेत असताना ते वर्गात न बसता घरी येऊन शिकत; म्हणजे भविष्यातील घरबसल्या शिक्षणाचा पाया त्यांच्या हातून नकळतच घातला गेला. ते व्यवसायाने अभियंता आहेत आणि २००६ पासून विद्यार्थ्यांना गणिताचे प्रशिक्षण देत होते. त्यांनी कॅट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली आणि त्यांना चांगले टक्के मार्क्स मिळत आहेत हे बघून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्थापन केलेल्या … Read more

एका स्टार्टअपने ड्रोनद्वारे फवारली ४,००० एकर शेतजमिनीवर कीटकनाशकं

‘स्कायलेन ड्रोनटेक’ या मध्य प्रदेशस्थित स्टार्टअपने ४,००० एकर शेतजमिनीवर ड्रोनद्वारे हवेतून कीटकनाशकं फवारल्याची माहिती दिली आहे. ‘स्कायलेन ड्रोनटेक’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रयास सक्सेना यांनी ही घोषणा केली आहे. ‘स्कायलेन ड्रोनटेक’ हे निव्वळ सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेले स्टार्टअप आहे. ड्रोननिर्मिती आणि दुरुस्ती या क्षेत्रात हे स्टार्टअप कार्यरत आहे. ड्रोनची विविधांगी उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी त्यांनी … Read more

Paytm मधून चिनी कंपन्या बाहेर

विजय शेखर शर्मा यांच्या Paytm या ई-कॉमर्स कंपनीतून प्रमुख गुंतवणूकदार असलेले चीनच्या अलिबाबा आणि Ant Financial यांनी आपली भागीदारी विकली आहे. पेटीएम मॉलने एका निवेदनात पुष्टी केली की अलिबाबा आणि अँट फायनान्शियल दोघेही फर्ममधून बाहेर पडत आहेत. अलिबाबा समूहाने ‘पेटीएम मॉल’मधील २८.३४ टक्के तर तिची उपकंपनी असलेल्या अँट फायनान्शियल्स कंपनीने १४.९८ टक्के हिस्सा विकला आहे. … Read more

महिना ₹१०,००० कमावणारा पुढच्या बारा वर्षांत उभी करतो देशातील टॉप-१० पैकी एक कंपनी | वाचा विजय शेखर शर्मांचा गेल्या बारा वर्षांचा प्रवास

त्याचे वडील एका छोट्याशा गावात शाळामास्तर होते आणि आई एक ग्रुहिणी. घरात मध्यमवर्गीय वातावरण आणि वडील शाळेत शिकवत असल्यामुळे साहजिकच घरात शिक्षणाचं खूप महत्त्व होतं. तो स्वतः एक संस्कारी मुलगा होता आणि कोणत्याही सामान्य मध्यमवर्गीय तरुणांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याच समस्या त्याच्या समोरही होत्या. कोणताही तरुण पाहतो तशी स्वप्न त्यानेसुद्धा पाहिली होती. शिक्षण पूर्ण … Read more

तुमची गुंतवणूक तुमच्या वारसांना सहजरीत्या मिळेल का?

हे जाऊन आज सात महिने झाले रोज कसली कसली गुंतवणुकीबद्दल पत्र येत असतात. नक्की कुठे काय गुंतवणूक केली आहे कळायला मार्ग नाही. त्या पत्रांवर काही ठिकाणी मोबाइल नंबर चुकीचा आहे तर काही ठिकाणी ई-मेल आयडी. काही ठिकणी नॉमिनीच ठेवला नाही. काहीच कळायला मार्ग नाही. आलेल्या पत्रावरून इतकंच कळतं की यांनी प्रामाणिकपणे पैसे कमवून ते वेगवेगळ्या … Read more