Ridhi Karan & Associates

तुमच्या व्यवसायात ‘रिव्ह्यू मॅकॅनिझम’ आहे का?

जगातील प्रत्येक व्यक्तीस आपली प्रगती व्हावे असे वाटत असते. नोकरी करणार्‍याला दरवर्षी प्रमोशन मिळावे असे वाटते. उद्योग करणार्‍याला मी मोठा उद्योजक व्हावे असे वाटते. मला ‘बिझनेमन ऑफ द इअर’ असा पुरस्कार मिळावा असे वाटते. थोडक्यात कुठल्याही क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीला आपला उत्कर्ष व्हावा असे मनोमन वाटत असते आणि ते वाटणे साहजिकच आहे, कारण प्रत्येकजण त्यासाठी … Read more

भारताचे नाव जगात उज्ज्वल करणारा महाकाय ‘टाटा’ समूह

ज्याने लोकांना धर्माबद्दल चार हिताच्या गोष्टी सांगायच्या, आपल्या धर्माचा जनसामान्यांमध्ये प्रसार करायचा आणि आपलं जीवन देवाधर्मात व्यतीत करायचं, त्याने जर वेगळी वाट निवडली तर काय होईल? प्रवाहाच्या विरुद्ध सहसा कुणी पोहत नाही, कारण स्थिरस्थावर होण्यासाठी पिढ्यानपिढ्या चालत आलेलं काम म्हणजे सुरक्षित आयुष्याची हमी. एक पारसी युवक होता ज्याचे वाडवडील पारसी धर्मगुरू होते. अर्थातच त्या युवकानेदेखील … Read more

गुंतवणुकीत ‘नंतर’ला अंतर…

गुंतवणूकविषयी माहिती तुम्ही तुमचे ऑफिसमधील सहकारी, ट्रेनमधील प्रवासी मित्र, वडिलांचे मित्र, जिममधील पार्टनर यांच्याकडून घेता का? (ते त्यामधील तज्ज्ञ असतील तर हरकत नाही) असे असेल तर सर्व आजाराची माहिती सहज ऐकायला मिळते. गुगलवर वाचायला मिळते, युट्युबवर पहायला मिळते. म्हणून डॉक्टरकडे न जाण्यासारखेच आहे. कुठल्याही गोष्टीची माहिती ही त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, माहितगार व्यक्तीकडूनच करून घ्यायला … Read more

आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी व्यवसाय सुरू करण्याचा धोका घेवून तर बघा!

प्रत्येकजण व्यवसाय करायला लागला तर त्याकडे नोकरी कोण करणार? असे जर आपले विचार असतील तर मग आपण नोकरीच करावी. उद्योग करायचा म्हणजे ध्येय लागते, हिंमत लागते, वाट पाहायची तयारी ठेवावी लागते, प्रत्येक कामासाठी तयार राहावे लागते, काळ-वेळ विसरून काम करावे लागते. मराठी कुटुंबातील आहात? तर तुम्हाला सर्वात आधी कुटुंबाचा विरोध सहन करावा लागेल. समाजाचे टोमणे … Read more

‘ज्ञान’ हाच यशाचा मार्ग

ही गोष्ट तुम्ही बर्‍याचदा ऐकली, वाचली असेल, पण थोडीशी उजळणी करूया. यशाच्या मार्गावर चालण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे. एका राज्यात एक प्रख्यात ज्योतिषी राहत होता. त्याने सांगितलेले भविष्य खरे ठरायचे, अशी लोकांची समजूत होती. दूरदूरच्या गावांतून लोक त्याला भेटायला यायचे. आपल्या आयुष्याविषयी चर्चा करायचे. ज्योतिषी त्यांना उत्तम मार्गदर्शन करायचा. ज्योतिष्याचं असं म्हणणं होतं की कोणत्याही … Read more

वेगाने वाढणाऱ्या ब्युटी इंडस्ट्रीतील उद्योगसंधी

भारताची लोकसंख्या १३० कोटी असून यातील ४८ टक्के लोकसंख्या २५ वयोगटाच्या खाली आहे. या वयोगटातील व्यक्ती आपल्या सुंदरतेवर अधिक लक्ष देतात. आज प्रत्येक महिला आपल्या सौंदर्याप्रती जागरूक झालेली आहेत. यामुळेच ब्युटीपार्लर या क्षेत्रात अनेक नवनवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. भारतात ब्युटी इंडस्ट्री या व्यवसायात दरवर्षी तीस टक्क्यांनी वाढ होत आहे. संपूर्ण जगात भारत या व्यवसायात … Read more

प्रवास एका आयुर्वेदिक डॉक्टरने स्थापन केलेल्या बलाढ्य कंपनीचा…

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा तो काळ होता. कलकत्ता शहरात हातावर पोट असलेल्या श्रमिकांची संख्या खूपच जास्त होती, आणि ते दाटीवाटीने उभ्या असलेल्या घरांमध्ये रहात असत. रोजंदारीवर काम करत ते आला दिवस ढकलत होते. आतासारखं वैद्यकीय शास्त्र निदान भारतात तरी आधुनिक झालं नव्हतं, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या रोगाची साथ ही नित्याची बाब झाली होती. कलकत्ता येथे एक … Read more

जाणून घेऊया बिझनेस अकाउंटिंगचा आत्मा असणाऱ्या ‘लेजर’बद्दल

पैसा एकाच ठिकाणी ठेवला किंवा फिरवला नाही, तर पैसा कुजतो आणि खराब होतो. त्यासाठी पैसा सारखा फिरवता असला पाहिजे. आपल्याकडचे धन, पैसे वेगवेगळ्या ठिकाणी कसे विखुरलेले, गुंतवलेले आहेत, हे फक्त ‘लेजर’ म्हणजेच ‘खतावणी’त दिसते. कॅश बुकात फक्त एका दिवसाचे व्यवहार दिसतात. कॅश बुकनंतर खतावणीला रकमा ट्रान्सफर कराव्या लागतात. लेजरमध्ये डायरेक्ट नोंद होत नाही. वर्षअखेर लेजरचा … Read more

एक छोटासा बदलही सुधारू शकतो तुमच्या व्यवसाय व्यवस्थापनातील त्रुटी

कमी कष्टात, कमी खर्चात, बरेच काही… स्वस्त आणि मस्त सगळ्यांनाच आवडते; पण कमी जणांना तसे करणे जमते. ज्यांना जमते ते चांगला नफा कमावतात. आपल्याला जमेल? प्रयत्न करायला काय हरकत आहे. गोष्टी स्वस्त करण्यासाठी कमी वेळात केल्या, कमी माणसांत केल्या तर त्या जमतात. मी एमएसएमई कन्सल्टंट आहे. त्यामुळे बर्‍याच कंपन्यांमध्ये जात असतो. तिथलीच एक गंमत सांगतो, … Read more

ठाण्यात आजपासून दोन दिवसीय ‘बिझनेस जत्रा’

‘लक्ष्यवेध’ या उद्योजक विकास संस्थेतर्फे ११ व १२ नोव्हेंबर रोजी उद्योग जत्रेचे आयोजन केले आहे. ठाण्यात टीप टीप प्लाझा येथे हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय एमएसएमइ मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच अनेक मान्यवर या सोहळ्यात उपस्थिती लावून उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. विविध उद्योजकीय संस्था, त्यांचे … Read more