अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस. असं मानलं जातं की या दिवशी ज्या ज्या गोष्टींची सुरुवात केली जाते, त्यांचा क्षय होत नाही. म्हणजे त्या गोष्टी बंद पडत नाही.
व्यापारउदीम सुरू करण्यासाठी, नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी, नवीन युनिट, नवी फॅक्टरी, नवे प्रॉडक्ट, नवी सेवा इत्यादी सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ म्हणजे चांगला मानला गेला आहे. त्यामुळे उद्योजक या दिवशी नवे संकल्प करून अनेक नवीन गोष्टींची सुरुवात करू शकतात.
अक्षय्यतृतीयेचं दुसरं महत्त्व म्हणजे हा दान करण्याचा दिवस मानला जातो. तुमच्याकडे ज्या गोष्टी अक्षय्य राहाव्यात, वाढत्या राहाव्यात असं वाटतं असेल त्यांचं दान या दिवशी केलं जातं. समाजात दानकार्यात उद्योजक, व्यापारी यांचा नेहमी मोलाचा वाटा राहिला आहे. सर्वाधिक दान हीच मंडळी करतात.
दानाचं महत्त्व सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलं आहे की, दान केल्याने तुमच्याकडील गोष्टी कमी होत नाहीत तर अनेक अज्ञात हातांनी तुमच्याकडे त्याचं गोष्टी boomrang होऊन तुमच्याकडे अनेकपटींनी परत येत असतात. त्यामुळे आपणही आपल्या स्तरावर यथाशक्ती दान आजच्या दिवशी करावं.
– टीम स्मार्ट उद्योजक
The post अक्षय्यतृतीया, उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस appeared first on स्मार्ट उद्योजक.