मल्टी टास्किंग हेच आपल्या यशाचं गमक बनवणारा दिनेश मेश्राम

माझं बालपण चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावी गेले आहे. माझे शिक्षण बी.ए. पदवीपर्यंत झाले आहे. लहानपणापासून सैन्यात भरती व्हायचं स्वप्न होतं त्याच प्रयत्नात असताना असिस्टंट कमांडंटमध्ये निवड झाली, पण मेडिकलमध्ये काही कारणांमुळे अनफिट करण्यात आले.

त्यातूनच वाचनालय सुरू करण्याची कल्पना सुचली व क्रांतिसूर्य विर बिरसा मुंडा वाचनालय सुरू केले. ज्यामुळे माझं तर नाही पण इतर मुलांचे स्वप्न पूर्ण करत येईल. पण वाचनालय चालवण्याकरता पैशांची गरज भासू लागली यातूनच माझ्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली.

माझ्याकडे कॉम्पुटरचे स्किल असल्यामुळे सुरुवातीला डेटा एन्ट्री जॉब वर्कपासून सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू ऑनलाईनचे काम यायला लागले. इंटरनेट नसल्यामुळे मोबाइलचे नेट वापरून काम चालू केले. त्यानंतर ग्राफिक्स, फोटो, लग्नपत्रिका, टॅक्सी सर्विस करता करता आज कॉम्प्युटरच्या जगात आपले नावाची नोंद केली.

कॉम्पुटर, लॅपटॉपचे रिपेअर करताना त्यातूनच एकदा प्रिन्टरचे काम आले. मला प्रिन्टरचे काम येत नव्हते, पण ते काम घेतले व एका मित्राच्या मदतीने रिपेअर करून दिले. त्यानंतर प्रिन्टरचेसुद्धा काम शिकून घेतले.

माझ्या व्यवसायात अनेक वेळा वाईट अनुभवसुद्धा आले. आर्थिक नुकसानसुद्धा झाले, पण त्यातूनच शिकून पुढे वाटचाल सुरू ठेवली. यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर मल्टिटॅलेंट आपल्यापाशी असणे आवश्यक आहे, तसेच जिथे लोकं रिस्क घेत नाही तिथेच तुम्हाला यश मिळत.

“नाही” हा शब्द आपल्या शब्द कोषातून काढून टाका व कोणतेही काम असो मी करीन, मला जमेल, हाच attitude आपल्या अंगी बाळगा. लक्षात असू द्या एक व्यवसाय करण्यापेक्षा अनेक व्यवसाय करा. जर एखादा व्यवसाय बंद पडला तर इतर व्यवसाय त्याचं नुकसान भरून काढतात. रोज आपल्याला मोटिवेट करत राहणे आवश्यक आहे त्यातून नवनवीन कल्पना व उत्साह मिळत असतो.

दिनेश उत्तम मेश्राम

कंपनीचे नाव : अथर्व कॉम्प्युटर्स सेल्स अँड सर्विस, अथर्व ग्राफिक्स
आपला हुद्दा : मालक
व्यवसायातील अनुभव : ६ वर्षे
तुमची उत्पादने व सेवा : कॉम्पुटर, लॅपटॉप, प्रिंटर सेल्स अँड रिपेअर, accessorise spare parts, ऑनलाईन व ऑफलाईन जॉब वर्क, डेटा एन्ट्री, ग्राफिक्स desinger, DTP, टॅक्सी provider, गोट फार्मिंग

व्यवसायाचा पत्ता : साई नगर वॉर्ड नं. 6, घुग्गुस, ता. जिल्हा. चंद्रपूर 442505
विद्यमान जिल्हा : चंद्रपूर
ई-मेल : meshramdinesh84@gmail.com
मोबाइल : 8087877289

प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती :

कॉम्पुटर लॅपटॉप प्रिन्टरचे रिपेरिंग सेल्स अँड सर्विस करून दिले जाते तसेच सर्व प्रकारचे spare parts सुद्धा मिळतील. कॉम्पुटर assemble करून मिळेल. बॅनर, फोटोस व मिक्सिन्ग करून मिळेल, DTP, लग्न्सपत्रिका व इतर ग्राफिक्सचे काम करून मिळेल. ऑनलाईन, ऑफलाईन जॉब वर्क, डेटा एन्ट्री, एक्सेल शीटचे कामे केली जातात. टॅक्सी सर्विस दिली जाते.

The post मल्टी टास्किंग हेच आपल्या यशाचं गमक बनवणारा दिनेश मेश्राम appeared first on स्मार्ट उद्योजक.