हे जग आता खुप अडव्हान्स्ड होत आहे. ही प्रगती विज्ञानामुळेच शक्य झालेली आहे. या प्रगतीमागे मानवाचेच कर्तृत्व आहे, अशी अहमपणाची भावना माणासामधे वाढीस लागलेली आहे. विशेषत: नव्या पिढीत तर ही भावना मोठ्या प्रमाणात आढळते, परंतू गेल्या दोन वर्षांत कोरोना या एका आजाराने सगळ्या जगाला चांगलाच धडा शिकवला.
कोरोनाच्या अदृश्य विषाणूने सगळ्या गतीमान जगाला काही काळ स्तब्ध केले. हतबद्ध केले. अहंकारी मानवजातीला तिच्या मर्यादा दाखवल्या. निसर्गासमोर मानव हा किती दुबळा आहे याचे प्रत्यंतर आणून दिले. आपण सगळे जण याचे साक्षीदार आहोत. अशा काही अकल्पनीय गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा जगाचे नियमन करणाऱ्या एखाद्या अदृश्य शक्तीपुढे माणसाला झुकावेसे वाटते. त्यासाठी त्याच्या घरात एक छोटासा कोपरा राखून ठेवावासा वाटतो. तो कोपरा म्हणजेच आपल्या घरातील देवघर किंवा पूजाघर.
नागपूर येथील विकास आणि जीवन गुजलवार या दोन बंधुंच्या म्हणण्यानुसार प्रत्येक घरात एक प्रेरणास्रोत असलेच पाहिजे. त्यामुळे आपल्याला दररोज प्रेरणा, ऊर्जा मिळेल. आपले विचार कोणत्याही परिस्थितीत कायम सकारात्मक राहतील. त्याच उद्देशाने त्यांची कंपनी ‘क्रिएटा इंटेरिअर कन्सेप्टस’ ही अतिशय आकर्षक आणि आजच्या युगातील घरांना साजेशी अशी देवघरे उर्फ पूजाघरे बनवते.
विकास आणि जीवन या नागपूर येथील जुळ्या बंधुंच्या ‘क्रिएटा इंटीरिअर कन्सेप्टस’ या कंपनीची यशोगाथा काहीशी निराळी, वैशिष्टयपूर्णच आहे. या कंपनीची स्थापना विकास आणि जीवन या गुजलवार बंधुंनी २००३ साली केली. त्यांच्या कंपनीत परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम असलेली देवघरे म्हणजेच पूजाघरे बनवली जातात. त्या देवघरांमध्ये संस्कृती आणि प्रगती यांचा अजोड मिलाप बघायला मिळतो. तसेच तुमच्या घराच्या इंटिरिअरला साजेसे असे सुबक देवघर ते बनवून देतात.
प्रत्येक घरात देवाचा वास असावा. त्याची कृपा घरातील सर्वांवर असावी, अशी या देघरांच्या निर्मितीमागील श्रद्धा आहे. देवघर घरातील वातावरण सात्विक, पापभिरू, सश्रद्ध आणि सकारात्मक बनते, अशी गुजलवार बंधुंची देवघर निर्मितीमागील धारणा आहे.
या दोन बंधुंपैकी जीवन गुजलवार हे मंदिराचे चित्र रेखाटतात तर विकास गुजलवार आणि त्यांची टीम त्या रेखाटनाला वास्तविक स्वरुपात उतरवून ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करतात. प्रत्येक देवघर हे नावीन्यपूर्ण असावे, यावर जीवन गुजलवार यांचा भर असतो. ते अधिकाकधिक आकर्षक व्हावे असा त्यांचा कटाक्ष असतो.
जीवन आणि विकास या जुळ्या बंधुंची आजवरची एकत्रित यशस्वी वाटचाल ही भाऊबंदकीतून एकमेकांचे पाय खेचण्यात धन्यता मानणाऱ्या लोकांसाठी डोळ्याच अंजन घालणारी आहे. या दोन बंधुंची जन्म एका अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. घरात उद्योजकतेची कोणतीही परंपरा नव्हती, पण हे दोन्ही बाऊ लहानपणापासूनच उद्योजक मानसिकतेचे होते. तसेच दोघांजवळ कलात्मक दृष्टीही होती.
लहानपणी ते पतंग, राख्या, खेळणी वगैरे कलात्मक गोष्टी बनवून विकत. यातच त्यांच्या भावी व्यावसायिक जीवनाची पायाभरणी घडली. कलात्मकतेचा गुण आणि कलेचा व्यावसायिक वापर करण्याची जाण या दोन बंधुंत लहान वयापासूनच होती. या वस्तुंच्या निर्मिती व विक्रीतूनच त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
त्यांच्यातील जीवन यांना फाईन आर्टसमध्ये करिअर करायचे होते. त्यासाठी त्यांना पुढील शिक्षणासाठी शहरात राहावे लागणार होते. तेव्हा घरातील परिस्थिती बघून दुसरे बंधू विकास यांनी आपले शिक्षण थाबवून जीवन यांच्या शिक्षणाचा आर्थिक भार उचलण्याची जबाबदारी घेतली. जीवन यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली.
शिक्षण पूर्ण होताच जीवन आणि विकास यांनी कामासाठी मुंबई गाठली. एकमताने वाटचाल करणाऱ्या या दोन बंधुंनी मेहनतीच्या जीवावर चित्रपटाचे सेटस् बनवण्याच्या कामात अतिशय कमी कालावधीत चांगले नाव कमावले. २००३ साली त्यांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांच्याकडे लक्ष द्यायचे ठरवले. यासाठी आता जे काही करायचे ते नागपुरात राहून करू या. नागपुरात राहुनच आपेले ध्येय गाठायचे व जन्मदात्या आई-वडिलांची सेवाही करायची.
दोन्ही बंधुंच्या रोमारोमांत कला भिनलेली होती. कलेचा आर्थिक बळकटीसाठी उपयोग करण्यासाठी त्यांनी २००४ साली पेंटींग आणि म्युरल्स निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर इंटिरीअर डेकोरोशनचा ही व्यवसाय सुरू केला. सदर व्यवसाय करीत असताना त्यांना नेहमीच जाणवायचे की त्यांच्या इंचिरीअरला साजेसे देवघर सहजासहजी मार्केचमध्ये मिळच नाही. त्यातून त्यांनी स्वत:च आपल्या इंटिरीअरला साजेशी देवघरे बनवण्यास सुरुवात केली.
ही देवघरे ग्राहकांना आणि त्यांच्या परिचितांना अतिशय आवडू लागली. देवघरानं खूप मागणी येवू लागली. सुरुवातीच्या काळात अधिकाधिक आकर्षक देवघरे बनवण्याच्या ओढीने त्यांना आर्थिक नुकसानही होत असे, पण त्यामुळेच त्यांची देवघरे खूप आकर्षक बनत गेली आणि त्यांची मागणीही वाढली.
जीवन आणि विकास या जोडीचे काम ग्राहकांना खूप प्रभावित करीत असे. त्यांच्या देवघरांना फक्त नागपूर शहरातच नव्हे तर भारतभरात आणि परदेशातूनही मागणी येवू लागली. यातूनच त्यांचा आणि भारतातील देवघरांचा पहिला ब्रॅण्ड जन्माला आला. तो म्हणजे ‘क्रिएटा पूजाघर’.
गुजलवार बंधुंच्या ‘क्रिएटा पूजाघर’ या ब्रॅण्डच्या अंतर्गत बनलेली देवघरे ही परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधणआरी असतात. आधुनिक सोयींनी परिपूर्ण असणाऱ्या फ्लॅटस् व बंल्यांमधील देवघरेसुद्धा त्याच तोडीची म्हणजे आधुनिक इंटिरिअरला शोभणारी असावी, यावर गुजलवार बंधुंचा नेहमीच भर असतो.
‘क्रिएटा पूजाघर’ देवघरांच्या निर्मितीत उच्च प्रतीचा सागवान, ग्लास, प्लायवुड, एलईडी, पॅनेल्स, लामणदिवे इत्यादींचा वापर केला जातो. ही देवघरे बघून आपल्या मनातील सात्विक भाव जागृत होतात व नकळत आपली नाळ सनातन आध्यात्मिक व पुरातन संस्कृतीशी जोडली जाते. पूजा केल्यानंतर घरातील वातावरण सात्विक होते. मन प्रसन्न होते. मनातील अष्टसात्विक भाव जागृत होतात.
घरातील देवघर हे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून सात्विक भाव मनात ठेऊनच केलेले असावे. ते बोजड, अवाढव्य नसावे याची काळजी आपण घेतली पाहिजे. विशेषत: शहरी भागातील जागेची अडचण लक्षात घेऊन जीवन आणि विकास यांनी ९ इंचांपासून ते ७२ इंचांपर्यंत देवघरांची निर्मिती केली आहे. ग्राहकांच्या मागणी आणि घरांच्या साईजनुसार देवघरे ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत.
‘क्रिएटा पूजाघर’ सामान्य ग्राहकांपासून ते प्रिमियम ग्राहकांपर्यंत सर्वांना परवडतील अशी ५०० रुपयांपासून ते चौदा लाखांपर्यंतची देवघरे तयार करतात. त्यांची ही सर्व देवघरे www.poojaghar.world या संकेतस्थळावर बघता येतात व विकतही घेता येतात. तसेच अन्य अनेक ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरून आनलाईन विकत घेता येतात.
भारतातील सर्वात जास्त मंदिरांचे माडेल्स व डिझाईन्स पूजाघरकडे आहेत. ही सर्व माडेल्स जीवन गुजलवार यांनी कागदावर रेखाटलेल्या आकृतींना प्रत्यक्ष साकार करण्याचे काम विकास आणि कंपनीतील इतर कर्मचारी करतात. विकास गुजलवार हे कंपनीचे पूर्ण व्यवस्थापन आणि विक्री बघतात. त्यांच्या सहचारिणी स्नेहा गुजलवार या आर्थिक व्यवहार सांभाळतात. लहानपणीचा मित्र ज्ञैनेश्वर राऊत हे प्राडक्शन सांभाळतात तर इंटिरीअर आणि आर्कीट्क्टच्या व्यवसायात जीवन यांच्या सहाचारिणी अश्विनी गुजलवार या हातभार लावतात. अश्विनी या पेशाने स्वत आर्कीटेक्ट आहेत.
‘क्रिएटा पूजाघर’चे अजून एक वैशिष्ट म्हणजे या कंपनीत काम करणाऱ्या ६० टक्के कर्मचारी या महिला आहेत. ही सर्व देवघरे मुख्यत: महिलांनी बनवलेली असतात. त्यांच्या कर्मचारी वर्गाचे अजून एक वैशिष्टय म्हणजे अतिशय लो लेबर टर्नओव्हर रेशो हे होय. त्यांच्या कंपनीत २०-२० वर्षे काम करणारे कर्मचारी आहेत.
एकदा एका कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे रुजू झाले की सहसा तो सोडून जात नाहीत इतकी चांगली वागणूक त्याला त्यांच्या कंपनीत मिळते. सर्व कामगार येथे एक परिवार म्हणून काम करतात. कंपनीत काही दिव्यांग लोकांनाही सामावून घेण्यात आले आहे. सगळ्यांना मैत्रीपूर्ण वागणूक देऊन आपलंसं करमण्याचे क्रिएटा इंटिरिअर कन्सेप्टस् हे एक आदर्श उदाहरण आहे.
‘क्रिएटा पूजाघर’ वर्ष २०३० पर्यंत १ हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिला उद्योजिका घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहे. पूजाघर निर्मितीच्या माध्यमातून गुजलवार बंधू संस्कृती रक्षणाचे काम करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराचाही त्यांच्यावर वरदहस्त आहे. ‘क्रिएटा पूजाघर’चा व्यवसाय आता महाराष्ट्रात नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, अमरावती, नांदेड सोलापुरा येथे पसरलेला आहे. तर परदेशात अमेरिका, आस्ट्रेलिया इत्यादी देशांतही त्यांची पूजाघरे निर्यात होतात.
भारतात व भारताबाहेत क्रिएचा पूजाघर मंदिरांना एक वेगळीच ओळख आहे. ही ओळख आणि ख्याती मुख्यत मैखिक प्रसिद्धीद्वारेच मिळालेली आहे. यात जीवन आणि विकास गुजलवार यांचा सिहाचा वाटा आहे. जीवन आणि विकास गुजलवार यांच्या मते त्यांचा व्यवसाय ग्राहकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच भरभराटीला आला आणि यापुढेही ग्राहक अशीच साथ देतील अशी त्यांना आशा आहे. ते आपल्या यशाचे सर्व श्रेय ग्राहकांना देतात.
वाढत्या मागणीनुसार त्यांनी दोन एकर जागा घेतली आहे. तिथे प्रशस्त कारखाना सुरू करून भारतातील सर्व मेट्रोसिटीज आणि वीस देशांमध्ये पूजाघरचा ब्रॅण्ड पोचवण्याचा संकल्प त्यांच्या मनात आहे. त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. या दोन बंधुंनी एकदिलाने केलेली ही वाटचालही मराठी माणसांसाठी एक आदर्शच आहे.
संपर्क : धम्मा दहिवले (मुख्य कार्यकारी अधिकारी)
9370302228
ई-मेल : cic@creatagroup.com
The post या जुळ्या बंधूंनी तयार केला देशविदेशातील देवघरांमध्ये ठसठशीत उठून दिसणारा ‘क्रिएटा पूजाघर’ हा ब्रॅण्ड appeared first on स्मार्ट उद्योजक.