आयआयटी खरगपूरने ई-रिक्षासाठी विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे व्यावसायिक उत्पादनासाठी हस्तांतरण

इलेक्ट्रिक वाहनांसाठी ९० टक्क्यांपेक्षा जास्त घटक आणि त्याचे तंत्रज्ञान जसे की मोटर, कंट्रोलर, कन्व्हर्टर, बॅटरी व्यवस्थापन यंत्रणा, चार्जर आपल्या देशात आयात केले जातात. आपल्या पर्यावरण, रस्ते आणि रहदारी यासाठी ते अनुकुल नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) इलेक्ट्रिक वाहन उपप्रणालींच्या स्वदेशी विकासासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे.

सुरुवातीला दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या तंत्रज्ञानाचा विकास हाती घेण्यात आला. कारण आपल्या रस्त्यांवरील 80 टक्क्यांपेक्षा जास्त वाहनांमध्ये ते योगदान देते. उपरोक्त कार्यक्रमांतर्गत आयआयटी खरगपूरने ई-रिक्षांसाठी स्वदेशी, कार्यक्षम, परवडणारी आणि प्रमाणित बीएलडीसी मोटर आणि स्मार्ट कंट्रोलर विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान ‘ब्रशलेस मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’कडे व्यावसायिक उत्पादनासाठी हस्तांतरित करण्यात आले.

या वेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) सचिव अल्केश कुमार शर्मा, अतिरिक्त सचिव डॉ. जयदीप कुमार मिश्रा, समूह समन्वयक (इलेक्ट्रॉनिक्समधील संशोधन आणि विकास), सुनीता वर्मा, आयआयटी खरगपूरचे डॉ. सोमनाथ सेनगुप्ता, आणि MeitY चे वैज्ञानिक ओम कृष्ण सिंह उपस्थित होते. हे तंत्रज्ञान हस्तांतरण ‘डिजिटल इंडिया’ सप्ताहाचा एक भाग आहे. सप्ताहाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जुलै २०२२ रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे केले होते.

The post आयआयटी खरगपूरने ई-रिक्षासाठी विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे व्यावसायिक उत्पादनासाठी हस्तांतरण appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment