Ridhi Karan & Associates

उद्योगोपयोगी ॲप : मेटा बिझनेस सुट

आपल्यापैकी अनेकांना एक ठराविक मर्यादेनंतर सोशल मीडिया हा सोसेनासा होतो. तेच ते लोकांचं हसणं, रडणं, फोटो, व्हिडीओ, पार्ट्या पाहून कंटाळा येतो. अशामध्ये हल्ली मार्केटिंगतज्ज्ञ सांगतात की धंदा वाढवायचा असेल, तर फेसबुकवर मार्केटिंग करा. एकीकडे सोशल मीडियाचा कंटाळा आणि दुसरीकडे तीच गरजसुद्धा. अशावेळी काय कराल? या प्रश्नाचं उत्तर आहे ‘मेटा बिझनेस सुट’. हे ॲप फेसबुकनेच तयार … Read more

भांडवल व भांडवलाचे प्रकार

कोणताही उद्योग सुरू करायचा म्हटला की पहिला प्रश्न उपस्थित होतो तो भांडवलाचा. किती भांडवल लागेल? कोण गुंतवणूक करील भांडवलाची? इ. एका अर्थाने भांडवल हा उद्योगाचा आत्मा असतो. भांडवलाविना कोणताही उद्योग चालू शकत नाही. व्यवसायाच्या प्रकारानुसार भांडवल कमी-अधिक असू शकेल, तो कोणत्याही उद्योगाचा अनिवार्य भाग आहे. भांडवलाची योग्य तरतूद केल्यावरच व्यवसाय योग्य पद्धतीत चालू शकतो व … Read more

शेतकरी बांधवांसाठी शेळीपालनाचा जोडधंदा लाभदायक : डॉ. भिकाने

नागपूरच्या महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (मपमविवि) अंतर्गत दूधबर्डी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित ‘शास्त्रोक्त शेळी व्यवस्थापन’ प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना प्रा. डॉ. अनिल भिकाने म्हणाले, “कृषीउत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी बांधवांनी व्यावसायिक पद्धतीने शेळीपालन केले तर अधिक नफा कमावणे शक्य आहे.” शेळीपालनासाठी येणारा कमी खर्च तसेच शेळीला लागणारा कमी आहार याच्या तुलनेमध्ये जास्त उत्पन्न मिळते, … Read more

व्यवसाय सुरू करताना तरुण उद्योजकांनी या ६ गोष्टींची काळजी घ्यायला हवी

तरुण वयात व्यावसायिक बीज रोवली गेली तर त्याचे दीर्घकालीन फायदे खूप होतात. कारण या वयात सुरू केलेले व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. मात्र तरुण वयात व्यवसाय करताना काही गोष्टींची कटाक्षाने काळजी घ्यावी लागते. अशा सहा महत्त्वाच्या गोष्टी खाली देत आहोत. १. तुमची व्यवसाय कल्पना व्यवहार्य आहे का? जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करता तेव्हा तुम्हाला तो … Read more

‘इन्फिबीम अव्हेन्यूज’ने ‘गो पेमेंट्स’मध्ये १६ कोटींची गुंतवणूक वाढवली

भारतातील पहिले सूचीबद्ध सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ‘इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेड’ यांनी आज जाहीर केले की त्यांनी ‘इन्स्टंट ग्लोबल पेटेक प्रायव्हेट लिमिटेड’, जी ‘गो पेमेंट्स’ म्हणून कार्यरत आहे यामध्ये १६ कोटी रुपये गुंतवून २.४२ टक्क्यांनी आपला समभाग वाढवला आहे. गुंतवणुकीनंतर ‘गो पेमेंट्स’मध्ये ‘इन्फिबीम’चा ५४.८० टक्के वाटा असेल. कोरोनाच्या कठीण काळातही ‘गो पेमेंट्स’ची कामगिरी दैदिप्यमान … Read more

आपल्या व्यवसायाचं कधी PEST ऍनालिसीस केलं आहे का?

एखादा उद्योग सुरू केल्यापासून अनेकविध घटकांचा त्यावर प्रभाव पाडत असतो. यातील काही घटक हे उद्योगांतर्गत असतात. जसे संस्थापक, भांडवल, कर्मचारी, ध्येये, उद्दिष्टे, धोरणे, इ. तर काही उद्योगाबाहेरील. उद्योगांतर्गत जे घटक असतात त्यांचा उद्योगावर पडणारा प्रभाव बऱ्यापैकी त्या उद्योगाच्या नियंत्रणात असतो. परंतु जे घटक उद्योगाच्या बाहेरील असतात, ते मात्र एखादा उद्योग आपल्या नियंत्रणाखाली आणू शकत नाही. … Read more

सेकंड-हँड कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘स्पिनी’ची गोष्ट

अनेक वर्षांच्या अनुभवानंतर त्यांच्या लक्षात आलं होतं की ज्यांना नवीन कार घ्यायची असते, त्यांची थोडी द्विधा मनःस्थिति असते. लोकांना वाटतं की नवीन कार घेण्यापूर्वी एखादी जुनी कार घेऊन ती काही काळ चालवून बघावी. तरुणांना कारची खूपच क्रेझ असते पण अडचण असते पैशाची. मग त्यांचा कल जुनी कार घेण्याकडे असतो, कारण ती त्यांच्या बजेटमध्ये बसते. वापरलेल्या … Read more