आयात आणि निर्यात म्हणजे काय ? आयात निर्यात व्यवसाय कसा सुरू करावा?

नमस्कार मित्रानो, काय तुम्हाला हे माहिती आहे का कि आयात आणि निर्यात कशासाठी केली जाते, आणि याचा उपयोग काय? तर स्वागत आहे तुमचे आमच्या या ब्लॉग मध्ये जो खास तुमच्यासाठी बनवला आहे …….आयात आणि निर्यात आपण कोणत्याही वस्तूची तसेच खाद्यपदार्थाची करू शकतो. आयात आणि निर्यात करून दोन्ही कडून आपण सारखाच नफा मिळवू शकतो

आज जागतिकीकरनामुळे अनेक देश दुसऱ्या देशामध्ये आपल्या वस्तूची आयात आणि निर्यात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयात आणि निर्यात आपण कोणत्याही वस्तूची तसेच खाद्यपदार्थाची करू शकतो. आयात आणि निर्यात करून दोन्ही कडून आपण सारखाच नफा मिळवू शकतो फरक फक्त एवढा कि उत्पादनाचा नफा मिळवण्यासाठी ज्या योग्य गोष्टी कराव्यात त्या आत्मसात करणे गरजेचे आहे.

आयात म्हणजे काय?

परदेशातून उत्पादने आयात करून ती उत्पादने त्यांच्या देशांतर्गत बाजारपेठेत विकण्याच्या प्रक्रियेला “आयात” म्हणतात. या व्यवसायाचे मूळ महत्व हे कि कमी किमतीत दुसऱ्या देशातून हि उत्पादने आणून आपल्या देशामध्ये हेच उत्पादने जास्त किमतीत विक्री करून जास्तीत जास्त नफा मिळवणे. हा व्यवसाय असा आहे ज्या मध्ये आपण जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. अनेक देशामध्ये बहुदा असे होते कि गरजेच्या वस्तूची उपलब्धता नसते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना वस्तूची आयात करून घ्यावी लागते.

निर्यात म्हणजे काय?

कोणत्याही देशात वस्तूची उत्पादकता जास्त वाढल्यास त्याची विक्री आपण दुसऱ्या देशात करू शकतो आणि या प्रक्रियेला “निर्यात” असे म्हणतात. निर्यात प्रक्रियेमध्ये आपण गरजेच्या वस्तूची निर्यात दुसऱ्या देशात करू शकतो आणि या प्रक्रियेला निर्यात असे म्हणतात. या व्यवसायाचे मूळ महत्व हे कि कमी किमतीची वस्तू दुसऱ्या देशात पाठवून त्यातून जास्त नफा मिळवणे, व आपले उत्पादन वाढवणे.

आयात आणि निर्यात करण्यापूर्वी खालील नोंदणी करणे आवश्यक आहे:

1) MSMEअंतर्गत नोंदणी
2) शॉप अ‍ॅक्ट नोंदणी
3) ना हरकत प्रमाणपत्र
4) IE कोड
5) जीएसटी नोंदणी

वरील सर्व नोंदणीसह तुम्ही आयात निर्यात व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्हाला हि तुमचा आयात आणि निर्यात व्यवसाय सुरु करायचा असेल तर आजच आमच्याशी संपर्क साधून आपली नोंदणी करून घ्या.

1 thought on “आयात आणि निर्यात म्हणजे काय ? आयात निर्यात व्यवसाय कसा सुरू करावा?”

Leave a Comment