‘इन्फिबीम अव्हेन्यूज’ने ‘गो पेमेंट्स’मध्ये १६ कोटींची गुंतवणूक वाढवली

भारतातील पहिले सूचीबद्ध सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ‘इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेड’ यांनी आज जाहीर केले की त्यांनी ‘इन्स्टंट ग्लोबल पेटेक प्रायव्हेट लिमिटेड’, जी ‘गो पेमेंट्स’ म्हणून कार्यरत आहे यामध्ये १६ कोटी रुपये गुंतवून २.४२ टक्क्यांनी आपला समभाग वाढवला आहे. गुंतवणुकीनंतर ‘गो पेमेंट्स’मध्ये ‘इन्फिबीम’चा ५४.८० टक्के वाटा असेल.

कोरोनाच्या कठीण काळातही ‘गो पेमेंट्स’ची कामगिरी दैदिप्यमान होती. म्हणूनच तिच्याकडे गुंतवणूक येते आहे. या गुंतवणुकीच्या बळावर देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारतण्याची ‘गो पेमेंट्स’ची योजना आहे.

‘गो पेमेंट्स’मधील गुंतवणुकीमुळे कंपनीला जलद गती मिळू शकेल, ज्यामुळे ‘इन्फिबीम’ला उत्तम परतावा मिळेल व ‘इन्फिबीम’च्या समभागधारकांनाही याचा लाभ होईल”, असे प्रतिपादन इन्फिबीम अव्हेन्यूजचे व्यवस्थापकीय संचालक विशाल मेहता यांनी यावेळी केले.

‘गो पेमेंट्स’ ही एक वित्तीय तंत्रज्ञान कंपनी आहे, जी ग्राहकांना भारतात १० हजारहून अधिक पोस्टल कोडमध्ये पॉप शॉप्स किंवा किराणा स्टोअर्स, प्रेषण सेवा, रिचार्ज आणि युटिलिटी बिल पेमेंट सेवा, ट्रॅव्हल बुकिंग, विमा सेवा, आधार बँकिंग सेवा आणि कॅश कलेक्शन यासारख्या सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करणारी सहाय्यक वित्तीय सेवा देते.

The post ‘इन्फिबीम अव्हेन्यूज’ने ‘गो पेमेंट्स’मध्ये १६ कोटींची गुंतवणूक वाढवली appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment