मराठी तरुणांना बिझनेस नेटवर्किंगसाठी राज्यव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ या संस्थेतर्फे भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १४ सप्टेंबर रोजी डोंबिवली येथे राज्यस्तरीय उद्योजकीय परिषद आयोजित केली आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, MSME, महाराष्ट्रचे संचालक पी.एम. पार्लेवार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, Maharshtra State Innovative Society चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेवराव भोसले असतील. तसेच ‘सॅटर्डे क्लब’चे अनेक अधिकारी आणि मेंबर या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
या परिषदेत सर्व उद्योजक सहभागी होऊ शकतात. मात्र त्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात दुपारी ३ ते ७ या वेळेत ही परिषद होणार आहे. अधिक माहितीसाठी राजेश चौधरी (८८७९३५३१११) किंवा राजेंद्र जोशी (९८३३३६६८५६) यांना संपर्क करू शकता.
The post उद्योग मंत्री आणि हणमंतराव गायकवाड यांच्या उपस्थितीत ‘सॅटर्डे क्लब’चा ‘इंजिनिअर्स डे’ appeared first on स्मार्ट उद्योजक.