एका स्टार्टअपने ड्रोनद्वारे फवारली ४,००० एकर शेतजमिनीवर कीटकनाशकं

‘स्कायलेन ड्रोनटेक’ या मध्य प्रदेशस्थित स्टार्टअपने ४,००० एकर शेतजमिनीवर ड्रोनद्वारे हवेतून कीटकनाशकं फवारल्याची माहिती दिली आहे. ‘स्कायलेन ड्रोनटेक’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रयास सक्सेना यांनी ही घोषणा केली आहे.

‘स्कायलेन ड्रोनटेक’ हे निव्वळ सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेले स्टार्टअप आहे. ड्रोननिर्मिती आणि दुरुस्ती या क्षेत्रात हे स्टार्टअप कार्यरत आहे. ड्रोनची विविधांगी उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी त्यांनी या प्रयोग यशस्वी करून दाखवला.

जगभरात विविध महत्त्वाच्या वस्तूंचे दळणवळण करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढतो आहे. भारतातही शेती आणि आरोग्य अशा अत्यावश्यक क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर वाढला तर याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. या क्षेत्रात स्टार्टअप ना बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.

– टीम स्मार्ट उद्योजक

The post एका स्टार्टअपने ड्रोनद्वारे फवारली ४,००० एकर शेतजमिनीवर कीटकनाशकं appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment