गुंतवणुकीत ‘नंतर’ला अंतर…

गुंतवणूकविषयी माहिती तुम्ही तुमचे ऑफिसमधील सहकारी, ट्रेनमधील प्रवासी मित्र, वडिलांचे मित्र, जिममधील पार्टनर यांच्याकडून घेता का? (ते त्यामधील तज्ज्ञ असतील तर हरकत नाही) असे असेल तर सर्व आजाराची माहिती सहज ऐकायला मिळते. गुगलवर वाचायला मिळते, युट्युबवर पहायला मिळते. म्हणून डॉक्टरकडे न जाण्यासारखेच आहे. कुठल्याही गोष्टीची माहिती ही त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, माहितगार व्यक्तीकडूनच करून घ्यायला हवी.

‘नंतर’ला अंतर म्हणजे काय?

गुंतवणूक क्षेत्रात म्युच्युअल फंड वितरक म्हणून काम करत असताना आम्ही नेहमीच सांगतो की, चक्रवाढ हे जगातील आठवं आश्चर्य आहे; ज्याला हे समजलं तो सधन झाला. पैसे कमावणे जितकं महत्त्वाचं तितकंच कठीण ते योग्य जागी गुंतवणूक करणं. आवश्यकता आहे त्या पैश्याची योग्य गुंतवणूक करणे म्हणजे खर्‍या अर्थाने त्याचे चीज होईल.

मी माझ्या संदर्भात बोलायचं झालं तर गेल्या पंधरा वर्षांत आजतागायत कधीही गुंतवणूक करा म्हणून फोन केल्याचे आठवत नाही. ते माझ्या तत्त्वात बसत नाही. कारण गुंतवणूक करणे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आवश्यक आहे. अनेकजण माहिती घेतात व नंतर करू असे म्हणतात. इएमआयसाठी पैसे असतात पण गुंतवणूकीसाठी नाहीत, ही मोठी आश्चर्यची गोष्ट आहे.

असो आज आपण बघणार आहोत थोडा उशीर आपल्या गुंतवणूकीवर कसा परिणाम करत असतो. वरील उदाहरण बघाल तर लक्ष्यात येईल दरमहा ५,००० एखादी व्यक्ती पंधरा वर्षांसाठी १२ टक्के व्याजाने गुंतवणूक करत असेल तर गुंतवणूक होते ९ लाख व त्याचे मूल्य २५ लाख.

ही व्यक्ती खरं तर मला पाच वर्षे आधीच भेटून, माहिती घेऊन गेलेली असते, पण “नंतर करू” म्हणून राहून गेले असते. पण त्यांनी खरंच ५ वर्षे आधी गुंतवणूक केली असती तर ५,००० दरमहा गुंतवणूक १२ लाख मूल्य ५० लाख.

५ वर्षे उशिरा गुंतवणूक व जवळपास २४ लाख रुपयांचं नुकसान. गुंतवणूक बघाल तर फक्त ३ लाख जास्त केली, पण येणार्‍या मुल्यात तफावत ही खूप मोठी आहे व हेच आहे जगातील आठवं आश्चर्य. तर EMI नी झुकत जायचं की SIP नी आर्थिक समृद्ध व्हायचं हे तुम्ही ठरवा.

– दिपक जोशी
– 9967072125
(लेखक म्युच्युअल फंड वितरक आहेत.)

Risk Factors Disclaimer : वरील माहिती ही फक्त माहितीपर सांगण्यात आली आहे. कुठल्या ही प्रकारच्या रिटर्न्सची खात्री दिलेली नाहीये, नाही कुठला गुंतवणूक पर्याय, फंड, सुचवला आहे. गुंतवणूक करताना योग्य माहिती कागदपत्रे व तुमची जोखीम क्षमता ओळखून योग्य अश्या माहीतगार व्यक्ती, तज्ज्ञाचे मार्गदर्शन घ्या.

The post गुंतवणुकीत ‘नंतर’ला अंतर… appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment