पियुष गोयल यांनी फॅशन उद्योगासाठी सांगितला ‘पाच एफ’ मंत्र

भारताच्या वस्त्रोद्योगाचे जगभरात नाव अधिक उंचावण्याकरता गोयल यांनी फॅशन उद्योगासाठी ‘5-एफ’ या मंत्रात फार्म्स टू फायबर टू फॅब्रिक टू फॅशन टू फॅशन टू फॉरेन एक्सपोर्ट अशी सुधारणा केली.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी १२ जुलै रोजी पंचकुला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या नवीन संकुलाचे उद्‌घाटन केले. एनआयएफटी ही फॅशन संबंधी शिक्षण देणारी देशातील अग्रणी संस्था असून कापड आणि तयार कपडे उद्योगाला व्यावसायिक मनुष्यबळ पुरवण्यात आघाडीवर आहे.

उद्‌घाटनानंतर आपल्या भाषणात पियुष गोयल यांनी या संकुलाचे नियोजन आणि बांधकाम करणारे विविध चमू, स्थापत्य विभाग, एनआयएफटी हरियाणा तंत्रशिक्षण आणि इतर विभागांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ज्यांच्यामुळे या संकुलाची स्थापना शक्य झाली ते हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या प्रयत्नांचे गोयल यांनी विशेष कौतुक केले.

The post पियुष गोयल यांनी फॅशन उद्योगासाठी सांगितला ‘पाच एफ’ मंत्र appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment