फार्मर प्रोड्युसर कंपनी काय तुम्हाला माहीती आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी (Farmer Producer Company) म्हणजे काय? व त्याचा लाभ काय? तर स्वागत आहे हा ब्लॉग खास तुमच्यासाठीच …..
फार्मर प्रोड्युसर कंपनी (FPC) ही भारतातील शेतकऱ्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. ही कायदेशीररित्या मान्यताप्राप्त संस्था आहे ज्याचा उद्देश सामूहिक शेती आणि कृषी उत्पादनांच्या विपणनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि जीवनमान वाढवणे आहे. शेतकऱ्यांना स्व:ताची (Farmer) अशी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करता येते. या उत्पादक कंपनी मागचा मुख्य हेतू असा आहे कि, शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कर्ज, विमा व सामूहीक शेती करून त्या शेतीतील मालाला मार्केट मिळवून देणे . शेती बरोबरच इतर उद्योग आणि समूह शेती करण्याचे फायदे या माध्यमातून तरुण शेतकऱ्यास ही उत्पादक कंपनी ही प्रेरणादायी ठरणार आहे
फार्मर प्रोड्युसर कंपनी रेजिस्ट्रेशन कसे केले जाते ?
कंपनीमध्ये ५ डायरेक्टर( दिग्दर्शक ) आणि ५ सभासद असे एकूण १० जण सभासद असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत महिला तसेच पुरुष हि सहभाग घेऊ शकतात. महिला वर्ग यात समाविष्ट असल्यास या योजनेचा आणखी जास्त प्रमाणात लाभ मिळू शकतो. कंपनीसाठी आपण चर्चा करून त्या कंपनीला एक विशिष्ट नाव देतो. जे नाव त्या कंपनी ची ओळख दर्शवतो. कंपनी स्थापनेचा प्रस्ताव हा संबंधित सी.ए. (C.A) यांच्यामार्फत मिनीस्टर ऑफ कोर्परेट अफेअर्स यांच्याकडे जातो आणि त्यानंतर कंपनी स्थापन करण्याची म्हणजेच सर्टिफिकेट ऑफ इनकॅार्पेरेशन चे परवानगी पत्र प्राप्त होते आणि हे पत्र अगदी तात्काळ काही दिवसामध्ये दिले जाते.
फार्मर प्रोड्युसर कंपनी नोंदणी करिता १० सभासदांची लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
१) आधार कार्ड.
२) पॅन कार्ड.
३) बँक स्टेटमेंट/जिओ बिल/लाइट बिल.
४) पासपोर्ट फोटो.
५) मोबाईल नंबर.
६) एक जनाचे लाइट बिल( कंपनी ऍड्रेस साठी ).
७) ७/१२.
कंपनीची नोंदणी प्रक्रिया
१) १० सभासदांची डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) करणे.
२) डायरेक्ट आयडेंन्टीफिकेशन नंबर (DIN)सक्रिय करणे.
३) कंपनीचे नाव निश्चित करणे.
४) मेमोरन्डम ऑफ असोसीशन (MOA)व आर्टीकल ऑफ आसोसीयशन (AOA) ही कागद पत्रे कागदाच्या व त्याच्या दोन्ही बाजु प्रिंट करून त्यावर स्टॅम्प लावावा लागतो व त्या वर प्रवर्तकने स्वत:चे, वडिलांचे नाव ,धंदा ,पत्ता व धारण केलेले शेअर्स ची संख्या ही माहिती भरून दिंनांकसह स्वाक्षरी करायची असते .
५)रजिस्ट्रार ऑफ कंपनी कडे (ROC) नोंदणी करणे.
६)सर्टिफिकेट ऑफ इनकापररेशन ची प्राप्ती.