मार्केटिंग का व कशासाठी करावी ?

मार्केटिंग का व कशासाठी करावी ?

मार्केटिंग हा व्यवहारातील अतिशय महत्वाचा मुद्दा मानला जातो. उत्पादनाचा आणि विक्रीचा प्रचार हा आपण मार्केटिंग च्या द्वारे सहजरित्या करू शकतो. काही लोक असे हि आहेत जे मार्केटिंग या शब्दाशी अपरिचित आहेत. मार्केटिंग करावी कशी? आणि का करावी? याची कल्पना हि त्यांना नसते, तर हा ब्लॉग त्यांच्या करीताच…………….


सध्य परिस्थितीमध्ये लोक बहुतांश विक्री आणि प्रचारा करीता मार्केटिंग ची मदत घेताना आपल्याला दिसतात, व या मध्ये त्यांना चांगला फायदा हि मिळतो. तंत्रज्ञान आभाळाशी खेटून प्रगती ची वाटचाल करत आहे. विचारांच्या पलीकडे आणि दृष्टीच्या हि उल्लेखनीय दर्जाची प्रगती आज तंत्रज्ञान बाळगून आहे. विक्री व प्रचाराची बळकटता वाढविण्यासाठी आपण मार्केटिंग चा हातभार घेतो. जेव्हा आपण मार्केटिंगच्या क्षेत्रात पाय ठेवतो तेव्हा हे लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे कि कितपत त्या व्यक्तीला व्यापाराच्या तंत्राचा अभ्यास वा समज आहे, ज्यात बाजारपेठ, ब्रँड व रचना अशा गोष्टी समाविष्ट आहेत.

आज अशी कोणती हि व्यक्ती नाही जी सोशल मीडिया शी अपरिचित आहे. लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया चा वापर करत आहेत, जसे कि., Whatsapp, Facebook, Instagram इत्यादी. हि काही माध्यमे आहेत ज्यात लोक आपली जाहिरात तसेच आपल्या उत्पादनाच्या विक्रीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही तुमचा एक स्वतःचा Product सोशल मीडिया च्या पद्धतीने Promote सुद्धा करू शकता.

मार्केटिंग मध्ये काम करत असलेल्या व्यक्तीस ग्राहकांशी संवाद साधने अति गरजेचे आहे. सांख्यिकीय माहिती, प्रश्नोत्तर, वाचनाची क्षमता आणि मनोविज्ञानाची आवड यांची उपयोगीता मार्केटिंग मध्ये जास्त प्रमाणात आहे. मार्केटिंग हे एक तंत्र आहे, ज्यामुळे व्यापारात वृद्धी होते आणि उत्पादन विकसित होते. लेखाची सगळ्यात महत्वाची भूमिका अशी कि मार्केटिंग क्षेत्रात ग्राहकांच्या आवडींचे अभ्यास केले पाहिजे व तसेच बाजाराच्या अभ्यासाचे तात्पर्य सेवा देण्याचे कार्य केले पाहिजे.

मार्केटिंगचे काही फायदे पुढीलप्रमाणे

1. मार्केटिंगचे महत्व: मार्केटिंगच्या संचालनामुळे उत्पादनांची विक्री वाढते आणि ग्राहकांना त्यांच्या आवडीचे उत्पादन आणि सेवा मिळतात. ह्यामुळे व्यापाराची संपत्ती आभाळाशी टेकते.
2. ब्रांडिंग: मार्केटिंगच्या माध्यमातून उत्पादनांची ब्रांडिंग केली जाते. एक चांगली ब्रांडिंग उत्पादनांच्या वेगवेगळ्या निर्मितीस चालना देते. या माध्यमातून उत्पादनांची मूल्ये वाढतात आणि उत्पादनांच्या ग्राहकांमध्ये वाढ होते.
3. दैनंदिन विकास: मार्केटिंगमुळे व्यापाराचा दैनंदिन विकास होतो आहे. व तसेच नवीन ग्राहकांचे प्राप्तीकरण होत चालले आहे.
4. ग्राहकांसोबत संपर्क साधणे: मार्केटिंग मध्ये ग्राहकांसोबत जवळीकता असणे फार गरजेचे आहे. त्यांच्याशी चर्चा करणे वा तसेच उत्पादनाची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचवून गरजेनुसार त्यांना त्यांचे उत्पादन खरेदी करण्यास साहाय्य करणे हे सर्वात महत्वाचे काम आहे.
तरीही आपल्या व्यवसायाची किंवा कोणत्या हि प्रकारची मार्केटिंग करायची असेल तर आजच ETaxwala शी संपर्क साधून आपली मार्केटिंग करून घ्या.

Leave a Comment