मराठी माणसाला श्रीमंतीचे धडे देणारा उद्योजक

मी शंभूराज दिलीप खामकर, राहणार पुणे मूळ गाव सातारा. माझे शिक्षण एमएससी आणि एमबीए झालं आहे. माझा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. मी एकत्र कुटुंबात राहतो आणि याचा स्वत:मधला उद्योजक घडवण्यासाठी मला फायदा झाला.

मी शेअर मार्केट या क्षेत्रामध्ये ट्रेडिंग आणि ट्रेनिंग क्षेत्रामध्ये मागील चौदा वर्षांपासून कार्यरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष कार्यशाळांद्वारे आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षित केले आहे.

मी २००७-०८ च्या वेळेस मार्केटमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला काही ब्रोकर्समार्फत ट्रेडिंग करायचो, परंतु चुकीची माहिती आणि अयोग्य मार्गदर्शन यामुळे माझी बर्‍याच वेळेला दिशा चुकायची आणि त्यामुळे सुरुवातीला बराच तोटा सहन करावा लागला. हे जवळपास तीन-चार वर्षे चालू होते. त्यानंतर मला लक्षात आलं की आपण हेच चालू ठेवलं तर एक दिवस पूर्णपणे कफल्लक होऊ.

त्यानंतर मी नवनवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात केली. मला शेअर मार्केटमधील गुंतवणूक कंपाऊंड पद्धतीने कशी वाढवायची, ट्रेडिंग कशाप्रकारे करायचं हे समजू लागले आणि त्याप्रकारे २०१२ च्या दरम्यान मी नव्याने सुरुवात केली. याच काळात बरेच मित्र माझ्याशी कनेक्ट होत गेले.

ही लोक मला सांगायचे जर तुला ही गोष्ट चांगली जमते तर तू आम्हालाही शिकव आणि मग मी एखादा रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी मित्रांना एकत्र करून यावर चर्चा करायचो, परंतु हे सर्व मी पूर्णपणे मोफत करायचो. त्यानंतर लक्षात आलं की लोक आपल्याकडून मोफत शिकतात आणि त्याचसाठी बाहेरून वेगवेगळे कोर्स करतात. वरून लोक मला असे फीडबॅक द्यायचे की तू सांगितलं होतं ते खूप डिटेलमध्ये होतं. आम्ही कोर्स केला पण आम्हाला काही डीपमध्ये शिकवलं नाही.

याच दरम्यान मी एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये ट्रेनर म्हणूनही काम करत होतो. इथे मला या गोष्टीची खात्री झाली होती की आपण उत्तम प्रकारे समजावून सांगू शकतो व त्यांच्या प्रश्नांचे निरसन करू शकतो आणि त्यांच्या आयुष्यातील एक चांगल्या गोष्टीला आपण पाठबळ देऊन त्यांना श्रीमंत करू शकतो. यातूनच मी हळूहळू महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर या शहरांमध्ये छोटे छोटे क्लासेस घेण्यास सुरुवात केली.

आपल्यामुळे आपली मराठी माणसं श्रीमंत झाली, तर त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील जेणेकरून आपण अतिशय उत्तम प्रकारे एक चांगलं जीवन जगू शकू यासाठी मी ‘शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी’ या नावाने माझी कंपनी सुरू केली तसेच एक युट्यूब चॅनल बनवून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर मी माझा प्रवास लोकांपुढे मांडायचो. त्यांना गोष्टी सांगायचो. विविध प्रकारे सहकार्य करायचो. अशातूनच माझ्यातून एक उद्योजक तयार झाला आणि मी एक यशस्वीपणे ट्रेडर आणि ट्रेनर बनलो.

आम्ही पूर्णपणे मराठीमध्ये लोकांना प्रशिक्षित करतो आणि त्यांना अगदी लाईफटाईमसाठी पूर्णपणे सपोर्ट देतो, कारण बरीच लोक अशी असतात की त्यांना लवकर शेअर मार्केट समजायला जमत नाही. वेळ लागतो. हाच धागा पकडून आम्ही एक उत्तम संस्था तयार केली की जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने लोकांना ट्रेनिंग देत आहे.

या व्यवसायामध्ये आता मला जवळपास आठ ते दहा वर्षाचा प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव आहे. मला शेअर मार्केट क्षेत्रात सर्वोत्तम कंपनी बनवायची आहे की जी आपल्या मराठी लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल आणि प्रत्येकाला एक श्रीमंतीचा मार्ग दाखवेल.

येणार्‍या २०२५ पर्यंत मला एक कोटी लोकांना प्रत्यक्षपणे शिकवायचे आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पोहोचायचे जेणेकरून आपल्या येणार्‍या पुढच्या पिढीला फायनान्शिअल फ्रीडम काय असतं आणि ते कसं करावं यावर शिकवलं जाईल.

व्यवसायात येणार्‍यांना मी एकच सांगेन की तुम्ही जर अशा प्रकारे या बिजनेसमध्ये येण्याचा विचार करताय तर पहिली गोष्ट तुमच्याकडे एक स्ट्राँग कन्सेप्ट आणि नॉलेज असावं आणि कन्सिस्टन्सी ठेवून आपण जर लोकांचा विचार केला तर नक्कीच याच्यामध्ये प्रत्यक्षपणे लोकांना फायदा होतो आणि आपणही एक उत्तम प्रकारे आपलं करिअर करू शकतो.

व्यवसाय म्हणलं की यश-अपयश आलंच. मी स्वत: तीन वेळा शून्य झालो होतो. मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या बिझनेस स्ट्रॅटेजी किंवा बाकीच्या गोष्टीमुळे लॉस सहन करावे लागले होते. कधीकधी असं वाटायचं की आता आपलं सगळं संपलं, परंतु मी जिद्द सोडली नाही आणि जे काही होईल त्याला तोंड दिलं. यातून शिकून माझ्यामध्ये ज्या काही चुका होत्या त्यावर मी मात केली आणि यशस्वी ट्रेडर आणि ट्रेनर बनलो.

व्यवसाय करताना कौटुंबिक आघाडी सांभाळताना खूप अडचणी येतात, कारण कुटुंबाला वेळ देणे शक्य होत नाही. परंतु माझ्या कुटुंबाने मला खूप मोलाची साथ दिली. माझी पत्नी ही नेहमी माझ्या बाजूने उभी असते. ती म्हणते तुम्ही बाहेरच्या सगळ्या गोष्टी सांभाळा, मी घरात मुलं आणि कुटुंबाकडे लक्ष देईन.

आई-वडील, भाऊ हेही प्रत्येक वेळी प्रेरणा देत असतात आणि जर काही गरज लागली तर मदत करतात. त्यामुळे मला कधीही मोठे प्रॉब्लेम आले तरी धीर येतो आणि आणखी नवीन काही करण्याचा मी जिद्दीने प्रयत्न करत असतो.

संपर्क : 9822500374

The post मराठी माणसाला श्रीमंतीचे धडे देणारा उद्योजक appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment