म्युच्युअल फंडात १२ टक्के परतावा मिळतो? जाणून घ्या यामागील सत्य

म्युचुअल फंड वितरक म्हणून गेली सोळा वर्षे काम करत असताना हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण हे सरासरी २ टक्के इतकं आहे, असं नुकतेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटलं आहे. म्युचुअल फंडमध्ये बारा टक्के परतावा मिळतो हे खरं आहे की थाप, या प्रश्नाकडे जाण्याआधी थोडी वेगळी माहिती घेऊया.

आपल्याकडे गुंतवणूक या विषयाला अतिशय सुमार दर्जा आहे. वेळ नाही, कंटाळवाणे, नंतर बघू, आता पैसे नाहीत ही उत्तर येतात. कोणी गुंतवणूकीसाठी तयार झालाच तर दोन प्रश्न प्रामुख्याने पुढे येतात.

१) सही कुठे करू?
२) चेक वर नाव काय लिहू?

थोडक्यात हे घ्या एकदाचे व निघा. तुम्ही १२-१४ तास काम करून पैसे कमावता, पण गुंतवणूकीबाबत इतकी उदासीनता? कुठे गुंतवणूक करणार? रिस्क किती आहे? किती वर्षे? किती टक्का परतावा हे प्रश्न विचारावे असं वाटत नाही. गुंतवणुकीबाबत असलेल्या या उदासीनतेमुळे अनेकांना फसवलं जातं.

तुम्ही म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करता तेव्हा त्याला सेबीचं संरक्षण असतं. गुंतवणूकदारांचे हित व हक्क काटेकोरपणे पालन होत आहे का नाही यावर सेबी बारीक लक्ष ठेवून असते.

म्युचुअल फंडमध्ये सर्वच फंड शेअर बाजारात गुंतवणूक करत नाहीत, पण शेअर मार्केट संबंधित असल्याकारणे कसलीही खात्री सेबीच्या नियमाप्रमाणे (परताव्याबाबत) देऊ शकत नाही. असे असले तरी म्युचुअल फंडचा इतिहास बघता यामधून आलेला परतावा हा इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा उजवा आहे.

म्युचुअल फंड हा बँक, पीपीएफ, पोस्ट ऑफिससारखा खात्रीदायक परतावा देत नाही, पण जेव्हा एखादा फंड १२ टक्के परतावा देतो म्हटल्यावर आपले कान टवकारले जातात. १२ टक्के याचा अर्थ दरवर्षी १२ टक्के असा होतो का?

उत्तर आहे नाही. वरील इमेजमध्ये बघाल तर लक्षात येईल पहिल्या वर्षी २७ टक्के (सकारात्मक) तर दुसर्‍या वर्षी -५ टक्के (नकारात्मक) परतावा आहे. नवव्या वर्षी -१२ टक्के (नकारात्मक) परतावा आहे, तर दहाव्या वर्षी २९ टक्के (सकारात्मक). वरील इमेजमध्ये कुठल्याही फंडचे नाव नाही व नाही रिटर्न्स फक्त माहितीपर आहे याची नोंद घ्यावी व या सर्वाची सरासरी काढली तर ती १२ टक्के होते.

नीट माहिती न घेता किंवा योग्य मार्गदर्शन अभावी गुंतवणूक करणार्‍यांची घोर निराशा होते. त्यांना वाटतं की दरवर्षी बारा टक्के सलग परतावा येईल, पण तसं नसतं सांगण्यासाठी हा प्रपंच.

– दीपक जोशी
9967072125
(लेखक म्युच्युअल फंड वितरक आहेत.)

The post म्युच्युअल फंडात १२ टक्के परतावा मिळतो? जाणून घ्या यामागील सत्य appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment