योग एक मोठी इंडस्ट्री

शारीरिक असो अथवा मानसिक आज आरोग्याची काळजी घेणे ही खूप मोठी गरज आहे. सध्याच्या कोरोना काळात योगा आणि त्या संबंधित व्यवसायाची मोठी इंडस्ट्री उदयाला येतेय. Online आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे उद्योगाची रोजगाराची संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. योग ही आता एक इंडस्ट्री बनते आहे आणि तिची व्यापकता सध्या दिवसेंदिवस वाढतेय.

आरोग्याशी संबंधित जागरूकता, योगाचा प्रचार- प्रसार हे सारं पाहता नव्या काळात योग करणारे आणि योग शिकवणारे असं मिळून एक नवीन व्यवसाय क्षेत्र वाढतंय. सध्या योग शिक्षक हा ट्रेंड चालू आहे. भारताने तब्बल पाच हजार वर्ष जुन्या मयोगाफला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. दर वर्षी २१ जून भारतात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो.

अर्थात काहीच येत नाही, चला योग करू पैसे कमावू असं करणार्या थातूरमातूर लोकांना इथं स्थान नाही. मात्र ज्यांना या विषयाची आवड आहे, याचे शास्त्रोक्त ज्ञान आहे अशांना अनेक नवीन संधी येत्या काळात मोठ्या प्रमाणात आहेत. योगातील करिअर असा विचार करताना मात्र हे लक्षात घ्यायला हवं की ही काही हमखास पगाराची, नाकासमोरची नोकरी नाही.

योग विषयात एखादी पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र मिळवल्यानंतर प्रत्येकाला नोकरी मिळेलच हे सांगता येत नाही. पण स्वतःचा स्वयंरोजगार किंवा उद्योग सुरू करता येईल.

या कामाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करू शकतो. आपल्या ओळखीतून आपले ग्राहक तयार करता येईल. या कामात घाई करून चालत नाही. छोट्या जागेत किंवा स्वतःच्या घरी योग क्लास घेऊ शकतो. शिवाय आपल्याकडे ज्यांना येणे शक्य नसेल त्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवता येईल. याशिवाय अनेक विविध संधी यात उपलब्ध आहेत.

याशिवाय या कामाची मागणी शाळेत, रुग्णालयात आणि कार्पोरेट हाउसमध्ये असते. कोणी ही योग शिकवणारी व्यक्ती शाळेत शिक्षक/शिक्षिका म्हणून काम करू शकते. त्याच प्रमाणे, रुग्णालयात जिथे थेरेपी सेंटर आहेत तेथे आपल्याला इन्स्ट्रक्टर किंवा प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते

याशिवाय योग रिसर्च सेंटर, योग अकादमी, हेल्थ रिसॉर्ट्स, जिम, खासगी आरोग्य केंद्र, हौसिंग सोसायटी, कॉर्पोरेट घराणी, प्रसिद्ध व्यक्तींचे योगगुरु अश्या अनेक ठिकाणी योग शिक्षकाची किंवा योग रोजगाराची संधी असते. अन्य कुठेही काही जमत नाही म्हणून चला योगच्या फिल्डमध्ये नशीब आजमावून पाहू असा विचार असल्यास हाती निराशा येण्याचीच शक्यता अधिक आहे.

सध्या योगचा फुगवटा अधिक दिसत असला तरी बहुतेकांना इन्स्टण्ट योगा हवा असतो, म्हणजे महिनाभरात वजन कमी करणारी योगासने वगैरे. पण योगात लगेच बदल घडून येत नसतो. त्यातील सातत्य महत्त्वाचं आहे. अर्थात, योगामध्ये आसनांची लोकप्रियता अधिक आहे. पण जेव्हा योग सर्वागाने शिकला-शिकवला जातो, तेव्हा त्याचं महत्त्व अधिक वाढतं.

योग एक्स्पर्टला कोणत्या व्यक्तीला कोणती योगासनं करायला सांगायची याचं अचूक ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. यात चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. प्राणायाम, ध्यानधारणा हे विषय संवेदनशील असल्यानं किती प्रमाणात आणि कोणी करायचे हे योगशिक्षकाला माहीत असणं आवश्यक आहे. योगशिक्षकाची जडणघडणही या प्रकारची व्हायला हवी. नसेल तर ती शिकून-समजून घेण्याची तयारी हवी.

योग एक्स्पर्ट बनण्यासाठी एखादा कोर्स केल्यानंतर जसाजसा तुमचा अनुभव वाढत जाईल, त्यातून नवीन संधी उपलब्ध होत जातील.स्वतः योग जीवनशैली काही प्रमाणात तरी आत्मसात करायला हवी. त्यासाठीची मानसिकता तयार करूनच या क्षेत्रात प्रवेश करावा.

योग शास्त्र हे खूप प्राचीन आहे. भारताचे हे वैभव आहे. भारत हा योगाचे ग्लोबल कॅपिटल आहे. पण आज यूरोप, अमेरिका, चीन मध्ये मोठ्या प्रमाणात योगाला मागणी आहे. तिथे झपाट्याने योगाचे महत्व वाढतंय. मुख्य म्हणजे तेथील लोकांना त्याचे महत्व पटतंय. याउलट भारतातच याचा उगम असला तरी म्हणावे तेवढे लोक आपल्याकडे जागरूक नाहीत.

योगाचे दैनंदिनी जीवनातील महत्व आणि व्यावसायिक संधी आशा दोन्ही आघाड्यांवर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढायला हवीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या याचे सकारात्मक चित्र आहेच. ऑनलाईनसुद्धा योगा आणि ध्यानधारणा याविषयी लोक अनुकुलता दाखवतायत हे चांगले आहे. अनेक अब्जावधीची ही व्यवसाय शाखा शास्त्रशुद्ध ज्ञानाच्या संवर्धनाने आपण जतन करू शकतो.

आपला झेंडा या क्षेत्रात वर ठेऊ शकतो. अन्यथा पुढील काही वर्षात परदेशातील योग एक्स्पर्ट भारतात येऊन भारतीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगतील, आपल्याला ते पटेल, आवडेल आणि आपण त्यांना त्यासाठी हवे तेवढे पैसेही मोजू..

योग कॅपिटल बूम दिवसेंदिवस वाढतोय. तो कायम राहण्याची आणि अधिकाधिक गतीने विकसित होण्याची शक्यता जगभरातील तज्ज्ञ वर्तवत आहेत. त्यामुळे योगाच्या ग्लोबल कॅपिटल असलेल्या भारताने त्यात आघाडी घेण्याची गरज आहे. अन्यथा याही क्षेत्नात चीन, अमेरिका, युरोप आणि रशिया आगेकूच करतील.

– टीम स्मार्ट उद्योजक

The post योग एक मोठी इंडस्ट्री appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment