‘लिंग्वासोल’ भरारी अनुवाद व्यवसायातील अग्रगण्य नावाची

भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. मग आपण आपल्या देशात असो वा परदेशात. जागतिकीकरणामुळे बाजारपेठा खुल्या झाल्या आणि व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावायला नवी कवाडे उघडली. त्याही पुढे डिजिटलायझेशनमुळे जग अजून जवळ आले. व्यवसाय सुलभीकरणासाठी मोठी संधी या माध्यमात आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायाची क्षीतिजे विस्तारण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे वेबसाइट बहुभाषिक करणे अथवा त्या त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमधून आपल्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवणे. म्हणजेच जागतिकीकरणामुळे केवळ इंग्रजीच नव्हे तर बहुभाषिक अनुवाद ही काळाची गरज म्हणून उदयाला आली.

व्यावसायिकांची हीच गरज ओळखून ‘लिंग्वासोल प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी पुणे येथून कार्यरत आहे. इंग्रजी भाषेचे महत्त्व आहे, परंतु त्याच्यासोबत स्थानिक भाषा आणि त्याची गरज याचा संगम सांभाळून पूरक व्यवस्था उभी करण्यासाठी ‘लिंग्वासोल’ झटत आहे. लोकांना याविषयी थोडी अनास्था आहे किंबहुना याची गरज, फायदा अजूनही लोकांना कळत नाहीय. याविषयी लोक जागरूक नाहीत, पण ‘लिंग्वासोल’ end to end सोल्यूशन आपल्या ग्राहकांना देते.

‘लिंग्वासोल’ ही अनुवाद क्षेत्रातील भारतातील एक अग्रणी कंपनी आहे. ‘लिंग्वासोल’ ही एकमेव अशी कंपनी आहे, जी पेटंट आधारित समाधान ग्राहकांना देते. सूक्ष्म व लघु व्यावसायिकांना आपला व्यवसाय हा देशांतर्गत आणि विदेशात व्यापक प्रमाणावर वाढवण्यासाठी वेबसाइट ट्रांसलेटर सोल्युशन देते. शंभरहून अधिक भाषांसाठी भाषांतर सेवा देऊ शकते.

भारताचाच विचार केला तर Vocal For Local हा नारा सध्या ऐकू येतोय. स्वदेशी वस्तुंना प्राधान्य देताना तळागाळात आपले उत्पादन किंवा सेवा पोहचवण्यासाठी ‘लिंग्वासोल’च्या सेवांचा लाभ व्यावसायिक घेऊ शकतो.

‘लिंग्वासोल’च्या कामाचे थोडक्यात स्वरूप सांगायचे झाल्यास ते दोन टप्प्यात काम करते. प्रथम मजकूर समजून घेते. डोमेन नाव, किवर्डस आणि कंपनीच्या इतर कोणत्याही मूळ भाषेतील मजकुराला धक्का लागू न देता अचूक भाषांतर सेवा दिली जाते तसेच त्यांचा आशय बदलणार नाही याचीही काळजी घेतात. ब्रॅण्डिंगवर लक्ष्य केंद्रित करते. मजकुरात सुसंगतता कशी राहील याचीही काळजी घेतात.

यासाठी प्रत्येक कंपनीच्या गरजेनुसार आवश्यक त्या अनुरूप शब्दांची स्वतंत्र डिक्शनरी, शब्दकोश तयार केला जातो. तो ग्राहकाच्या व्यावसायिक कामाच्या मागणीनुसार मानवी अनुवादित असतो. बर्‍याच वेळा ऑनलाईन ट्रान्सल्टर वर शब्दश: भाषांतरित होऊन आपल्याला मजकूर मिळतो. अशाप्रकारची मशीन आधारित सेवा देणारी अनेक अ‍ॅप आपल्याला मिळतात, पण त्यातून मिळणारे भाषांतर हे अनेक वेळा शब्दश: असते ज्यातून अर्थ बदलू शकतो. त्यामुळे निर्दोष, अचूक भाषांतर देण्यावर ‘लिंग्वासोल’चा भर असतो.

अनुवादात सुसंगतता, भाषेची गुणवत्ता, इंटरनेट कनेक्शनची आवश्यकत नसते. सीएमएस, डेटाबेसमध्ये कोणत्याही कोडशिवाय काम केले जाते. या संपूर्ण कामादरम्यान ग्राहकाच्या डेटा सुरक्षेची आणि गोपनीयतेची संपूर्ण काळजी घेतली जाते. या वैशिष्ट्यांमुळे भारतातील बावीसहून अधिक भाषांमध्ये, विविध बँकांसाठी आणि प्रथितयश प्रोजेक्टसाठी ‘लिंग्वासोल’ने सेवा दिली आहे. शंभरहून अधिक भाषामधून सेवा आणि लाखो ग्राहकांचे समाधान ‘लिंग्वासोल’ने केले आहे.

मल्टि लिंगवल सोल्युशनसाठी बी-टू-सी मध्ये बजाज फायनान्स, हाउसिंग डॉट कॉम, कारवाले, टाटा कॅपिटल, मेमीपोको, mylpg.in अशा मोठमोठ्या कंपन्यांना ‘लिंग्वासोल’ने सेवा दिलीय.

याशिवाय बँकिंग क्षेत्रात कोअर बँकिंग सिस्टमसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, बँक ऑफ बरोडा, इंडियन ओव्हरसीस बँक, इंडियन बँक, विजया बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, युको, अलाहाबाद, नाबार्ड अशा अनेक आघाडीच्या राष्ट्रीय तसेच विविध स्टेट बँकानाही ‘लिंग्वासोल’ सेवा देते.

वेब पोर्टलचा विचार करता हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, युनियन बँक, सॅप अफरीया याना सेवा देते. एआरपी सोल्युशनमध्ये, SAP, Gail India ltd, ONGC, MTDC, गुजरात राज्य सरकार, नाशिक महानगरपालिका इत्यादी लोकांना सेवा देते. यावरून आपल्याला कंपनीच्या कामाचा अवाका आणि त्याच्या कामाची गुणवत्ता लक्षात येते.

बावधन पुणे येथून कार्यरत असलेली ‘लिंग्वासोल’ची पस्तीस जणांची टीम आहे. लॉकडाऊनमध्ये आपल्या सहकार्‍यांचे मनोधैर्य वाढवत कंपनीने आपले कार्य अखंड चालू ठेवले. या काळात काम करत असताना अनेकांना व्यावसायिक वृद्धीसाठी स्थानिक भाषेच्या योगदानाचे महत्त्वही पटले हे विशेष. ‘लिंग्वासोल’ याचमुळे समांतर व्यवस्था उभी करण्यासाठी कटिबद्ध आहे.

Email: sales@linguasol.net
Website : www.linguasol.net

The post ‘लिंग्वासोल’ भरारी अनुवाद व्यवसायातील अग्रगण्य नावाची appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment