वेबसाईट म्हणजे काय ? व व्यवसायात याचे उपयोग काय ?

वेबसाईट म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो. काय तुम्हाला हे माहिती आहे का, कि आपल्याला गुगल जी माहिती दाखवते ती माहिती येते कुठून व ती दिसते कशी…? तर स्वागत आहे तुमचे आमच्या या ब्लॉग मध्ये, जो तुमच्यासाठीच बनवला आहे. ……….

वेबसाईट म्हणजे काय

आजचा काळ हा डिजिटल आहे आणि त्यामुळे आजच्या काळात वेबसाईट ला खूप महत्व आहे आणि खूप प्राधान्य आहे. अशी कोणतीही व्यक्ती आज दिसणार नाही जी आज डिजिटल युगाशी अपरिचित आहे. आज आपण पाहतो प्रत्येक वेळा आपण गुगल च्या मदतीने नवनवीन गोष्टी शोधत असतो. आणि गुगल ती माहिती आपल्याला पुरवते सुद्धा. तर हिच माहिती गुगल मध्ये एका विशिष्ट वेबसाईट (Website) च्या स्वरूपात साठवलेली असते. जेव्हाही आपण एखादी वेबसाईट गूगल वर टाकतो अगदी तात्काळ वेळेत आपल्याला त्याची संपूर्ण माहिती मिळते.

सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे उदा, etaxwala .com हि आमची एक अशी वेबसाईट आहे ज्यामध्ये आमच्या व्यवसायाची सर्व माहिती गरजू लोकांना मिळून जाते. वेबसाईट वर आपण गेल्यानंतर आपल्याला Contact Us, About Us, Help अशा काही गोष्टी दिसतात, ज्याच्या माध्यमातून आपण कंपनीशी थेट संपर्क साधू शकतो. जेव्हा कधीहि User हि वेबसाईट गूगल वर टाकेल तेव्हा त्याला त्या वेबसाईट बद्दल ची पूर्ण माहिती अगदी तात्काळ मिळून जाते.

व्यवसायात वेबसाईट चे फायदे आणि उपयोग :

तुमची वेबसाइट ग्राहकांना तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि तुमची उत्पादने, सेवा आणि व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा सोपा मार्ग प्रदान करते. सोशल नेटवर्क यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावते. तुमची माहिती अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुमचा बिजनेस अधिक चर्चित करण्यासाठी सोशल मीडिया एका वेबसाईटच्या मार्फत एक चांगले योगदान ठरू शकते.

  1. वेबसाइटचा उपयोग केल्यास, आपण आपल्या उत्पादनांची आणि सेवांची माहिती ग्राहकांना देऊ शकतो. त्यामुळे ग्राहक तुमच्या उत्पादनांचे विचार करून त्याची खरेदी करणे हे तुमच्यासाठी अगदी फायद्याचे ठरू शकते.
    1. तुम्ही तुमच्या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन मार्केटिंग कार्यक्रमे सुरु करू शकता. तुम्ही आधुनिक व्यापारातील संगणकांचा वापर करून विक्री वाढविण्यासाठी ऑनलाइन विज्ञापनाची मदत घेऊन व्यवसायास आणखी चालना देऊ शकता.
    2. वेबसाइटच्या माध्यमातून आपण ऑनलाइन विज्ञापन करू शकता. आपल्याला उत्पादनांचे विज्ञापन/जाहिरात वेबसाइटवर प्रदर्शित करता येते जेणेकरून लोकांना आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती मिळते.
    3. वेबसाइटद्वारे आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढते. ती आपल्या कंपनीची माहिती देते जसे की, कंपनीचा इतिहास, उत्पादन विवरण, सेवा प्रदान केलेल्या ग्राहकांची प्रतिक्रिया, नियम व अनुशासन, संपर्क माहिती इत्यादी, त्यामुळे ग्राहकांना आपल्या व्यवसायाबद्दल संपूर्ण विश्वास बसतो.

जर तुम्हाला हि तुमच्या व्यवसायाची अधिकृत वेबसाईट चालू करायची असेल तर आजच आमच्याशी संपर्क साधा.

Leave a Comment