व्यवसायामधील मार्केटिंग चे महत्व आणि मार्केटिंग चे काही सर्वोत्तम प्रकार…..

व्यवसायामधील मार्केटिंग चे महत्व आणि मार्केटिंग चे काही सर्वोत्तम प्रकार…..

कदाचित तुम्हाला मार्केटिंग या शब्दाची चांगली माहिती असेल कारण प्रत्येक उद्योजकाला मार्केटिंग करणे आणि त्याबद्दल माहिती असणे आवश्यक असते जो त्याच्या व्यवसायाद्वारे काहीतरी विकत आहे. मार्केटिंग हे दुसरे काहीही नसून उत्पादन/सेवा विक्रीचा एक भाग आहे जिथे तुम्ही ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा ओळखता आणि त्या तुमच्या उत्पादन आणि सेवांद्वारे पूर्ण करता. व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना वस्तूचे उत्पादन किंवा सेवा विकण्यासाठी त्याचा प्रचार, प्रसार आणि मार्केटिंग करणे हा फार महत्वाचा आणि आवश्यक भाग आहे. मार्केटिंगद्वारे, उद्योजक लोकांना त्याच्या उत्पादन किंवा सेवेबद्दल जागरूक करतात आणि लोकांना त्याची उपयुक्तता सांगतत् व त्याचे महत्व पाटवून देतात जेणेकरून ते त्याचे उत्पादन किंवा सेवा खरेदी करू शकतील व त्याचा पुरेपूर वापर करू शकतील. सध्याच्या काळात मार्केटिंगचे स्वरूप हे तुम्ही अनेक प्रकारात पाहू शकता जसे कि तुम्ही जाहिरात, माहितीपत्रक, प्रेस रिलीज, फेसबुक पेज किंवा ट्विटर अकाऊंटच्या स्वरूपात पाहू शकता. कोणत्याही व्यवसायासाठी मार्केटिंग खूप महत्वाचे असल्यामुळे मार्केटिंग टिप्स बद्दल बोलणे खूप महत्वाचे असते. पण त्या आधी मार्केटिंग अधिक खोलवर समजून घ्यायला हवे.

मार्केटिंग चे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत

१) सामान्य मार्केटिंग (General Marketing):

सामान्य मार्केटिंग हे साधारणपणे उत्पादनांची विक्री करण्यासाठी वापरले जाणारे विपणन तंत्र. ह्यात टेलिव्हिझन, रेडिओ, प्रिंट मीडिया, बिलबोर्ड, डायरेक्ट मेलिंग (पत्रप्रारंभ), उत्पादनांचे वितरण, दुकाने, संपर्क केंद्र, आणि अधिक इतर तंत्रे शामिल आहेत. ज्याद्वारे व्यक्ती आपली मार्केटिंग या माध्यमातून करू शकते.

२) डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing):

डिजिटल मार्केटिंग हा ऑनलाइन मार्केटिंग चा भाग आहे ज्याद्वारे आपण मार्केटिंग चे सूत्र मांडू शकतो . या क्षेत्रात आपण इंटरनेटवर ऑडिओ, व्हिडिओ, तसेच आपल्या साहित्यिक आणि व्यापारिक माहितींचा वापर करून आपण आपल्या वस्तूची आणि तसेच सेवांची मार्केटिंग करू शकतो. सोशल मीडिया मार्केटिंग, इमेल मार्केटिंग, वेबसाइट विकसिती, खोज इंजन ऑप्टिमाइजेशन (SEO), पेपर क्लिक (PPC) विज्ञापन, आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत क्षेत्रांद्वारे आपण एक अति उत्तम प्रकारे मार्केटिंग करू शकतो.

३) नेटवर्क मार्केटिंग (Network Marketing):

नेटवर्क मार्केटिंग याला ‘मल्टी-लेवल मार्केटिंग’ किंवा ‘आपत्ती मार्केटिंग’ म्हणून हि ओळखले जाते. नेटवर्क मार्केटिंग विविध नावांनी ओळखले जाते, ज्यामध्ये मल्टीलेव्हल मार्केटिंग (MLM), सेल्युलर मार्केटिंग, संलग्न मार्केटिंग, ग्राहक-प्रत्यक्ष विपणन, रेफरल मार्केटिंग किंवा घर-आधारित व्यवसाय फ्रेंचायझिंग यांचा समावेश आहे.

४) टेलीमार्केटिंग (Tele Marketing):

टेलीमार्केटिंग म्हणजे फोनद्वारे केली जाणारी मार्केटिंग. ह्या प्रकारच्या मार्केटिंग ला विशेष प्राधान्य आहे. व्यवसायात तसेच अनेक प्रकारामध्ये टेलिफोनिक माध्यमाद्वारे मार्केटिंग केली जाते, ज्यामध्ये ग्राहकांशी थेट संपर्क साधून त्यांना महत्व पटवणाऱ्या विषयावर चर्चा केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, वितरकांनी खरेदीसाठी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना फोन करून प्रमोशन केले जाते.

५) सामाजिक मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing):

अलीकडील काळात सोशल मीडिया म्हणजे एक महत्त्वाचे मार्केटिंगचे माध्यम मानले जात आहे. या प्रकारच्या मार्केटिंगमध्ये ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, लिंक्डइन, टिकटॉक तसेच अनेक प्रकारच्या प्लॅटफॉर्म चा वापर होतो, ज्याद्वारे मार्केटिंग केल्या जाऊ शकते. या पद्धतीच्या मार्केटिंगद्वारे आपण ग्राहकांचा अगदी जवळ जाऊ शकतो व लोकांचा अगदी उत्तम प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतु शकतो. व्यवसायात वाढीसाठी अशा प्रकारची मार्केटिंग अगदी उपयोगी ठरू शकते.

६) कंटेन्ट मार्केटिंग( Content Marketing ):

हे एक मार्केटिंग चे महत्वाचे रूप मानले जाते. कारण कि ह्या प्रकारच्या मार्केटिंग मध्ये आपल्याला कंटेन्ट हे Text ,Infographic, Video, Image, Audio अशा पद्धतीने प्रसारित करता येऊ शकते. आपण या पद्धतीची मार्केटिंग करणे अति सोयीस्कर असू शकते. हे कन्टेन्ट मार्केटिंग आपण ध्वनी स्वरूपात आणि दृश्य स्वरूपात हि बऱ्याच पैकी ऐकलं असेल. एक दचलू घडामोडी चे उदाहरण सांगायचे झाले तर
“रेडिओ” रेडिओ वर अनेक प्रकारच्या मार्केटिंग चे स्वरूप आपल्याला ऐकण्यास मिळते.

७) अफिलिएट मार्केटिंग(Affiliate Marketing):

अफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण कोणतीही वस्तू निवडू शकतो आणि त्याची जाहिरात आपल्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया वर करू शकतो. जर कोणी त्या जाहिरातीवर क्लिक करून खरेदी केली तर त्या वस्तूच्या किमती नुसार काही टक्के पैसे मोबदला म्हणून आपल्याला मिळतात. या मध्ये वस्तू शिवाय signup installation, registration, click अशा विविध प्रकारच्या जाहिराती मधून देखील पैसे कमवता येतात.

८) इन्फ्लुएन्सर मार्केटिंग (Influencer Marketing ):

इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हे ट्रॅडिशनल मार्केटिंगच्या तुलनेत जास्त वर्चस्व गाजवू लागले आहे. जसे कि अभिताभ बच्चन घडी डिटर्जेन्ट या प्रॉडक्ट ची advertise करताना अनेक वेळा आपल्याला टीव्ही वर दिसतात .अशाच प्रकारे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ज्ये सुद्धा प्रॉडक्ट ची जाहिरात केली जाते. थोडक्यात असे कि आपल्या सर्वांना आवडत असलेले सेलिब्रिटी किव्वा सोशल मीडिया स्टार्स या प्रॉडक्ट विषयी आपल्याला थोडक्यात माहिती देतात आणि ते प्रॉडक्ट विकत घेण्याचा सल्ला देतात.

व्यवसायामधील मार्केटिंग चे महत्व आणि मार्केटिंग चे काही सर्वोत्तम प्रकार…..

ह्या प्रकारचे विविध मार्केटिंगचे प्रकार आपल्याला व्यापार वाढीसाठी आणि ग्राहकपर्यायांची वाढ साधण्यासाठी सहाय्य करण्यासाठी उपयोगी ठरतात. आपल्या व्यापाराचे प्रकार आणि ग्राहकांचे आकर्षण कोणत्या प्रकाराच्या मार्केटिंगद्वारे करण्यात येते, हे निर्धारित करण्यासाठी आपल्याला आपल्या क्षेत्रातील मार्केटिंग चा अभ्यास करणे अतिआवश्यक आहे. आपल्या आवडत्या प्रकाराच्या मार्केटिंग कार्यपद्धतीचा उपयोग करून आपण आपल्याला व्यवसायाला अधिक चालना देऊ शकतो.

जर तुम्हाला हि तुमच्या व्यवसायाची तसेच कोणत्या हि प्रकारची मार्केटिंग करायची असेल तर आजच आमच्याशी संपर्क साधा आणि एक अति उत्तम प्रचार करून घ्या.. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच वाचा आणि गरजू व्यक्तीस वाचण्यास सांगा……..

Leave a Comment