व्यवसायामध्ये असणारे शॉप ऍक्ट लायसेंन्स चे काही महत्व व फायदे…..

व्यवसायामध्ये असणारे शॉप ऍक्ट लायसेंन्स चे काही महत्व व फायदे…..

आज आपण या ब्लॉगमध्ये शॉप ऍक्ट या लायसेंन्स बद्दल चर्चा करणार आहोत. हा कायदा का व कशासाठी लागू केला आहे या बद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. शॉप ऍक्ट हा एक असा कायदा आहे जो सगळ्या भारतामध्ये अनिवार्य केला गेला आहे. प्रत्येक राज्या मध्ये याच्या तरतुदी समान आहेत . शॉप ऍक्ट हा सर्व दुकानांना अनिवार्य कायदा लागू घालतो. प्रत्येक दुकानदाराने तसेच कोणता हि व्यवसाय करण्याऱ्या व्यक्तीने ३० दिवसाच्या आत त्या दुकानाची किव्वा व्यवसायाची एक नोंदणी करने आवश्यक आहे ज्याला आपण ” शॉप ऍक्ट लायसेंन्स ” असे म्हणतो.

शॉप ऍक्ट लायसेंन्सचा सर्वात मोठा फायदा असा कि यामुळे आपल्या व्यवसायास एक सरकारमान्य दर्जा प्राप्त होतो. या कायद्याचा नियम असा आहे कि यामध्ये व्यापारी कोणते हि भौतिक दुकान न टाकता घर बसल्या हि कोणता व्यवसाय करत असतील तर त्यांना ही शॉप ऍक्ट लायसेंन्स काढणे अनिवार्य आहे. व्यवसाय कुठला हि असो किव्वा कोणत्या हि प्रकारचा असो शॉप ऍक्ट प्रमाणपत्र काढणे हे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे शॉप ऍक्ट लायसेन्स नसेल तर तुमचा व्यवसाय किव्वा उद्योग बंद सुद्धा पडू शकतो. शॉप एक्ट लायसन्स महत्वाचे असले तरी कसे काढावे? कोठे काढावे? किती खर्च येतो? किती वेळ लागतो याची माहिती नसल्याने अनेकदा फसगत होते, किंवा यासाठी काम करणारे दलाल तुमची आर्थिक लुट करतात.

आपल्यापैकी बहुतेकांचा छोटा व्यवसाय किंवा उद्योग किंवा दुकान आहे, ते दुकान आपण आपल्या गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी चालवतो. पण भविष्यात तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करायचा असेल? त्याची शाखा काढायची असेल? व्यवसाय वाढीसाठी बँक लोन हवे असेल? आयटीआर दाखल करायचा असेल? बँकेत दुकानच्या नावाने खाते काढायचे असेल तर शॉप ऍक्ट लायसन्स अत्यावश्यक असते.शॉप ऍक्ट हा कायदा मुळातच व्यवसायांना आणि दुकानांना नियमन घालण्यासाठी म्हणजेच नियमांच्या चौकटीमध्ये ठेवण्यासाठी सुरु केला गेला आहे, हा कायदा जेव्हा सुरु झाला त्यांनतर अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळत आहेत.

शॉप ऍक्ट लायसेन्स चे फायदे:

१) शॉप ऍक्ट लायसेन्स काढल्यानंतर व्यावसायिक व्यक्ती बँकेत व्यवसायाचे चालू खाते (Current Account) सुरू करू शकतात.

२) कोणत्या हि व्यवसायाचे जेव्हा आपण लायसेंन्स काढतो तेव्हा त्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून आपल्याला बँकेकडून काही कर्ज सुविधा मिळू शकते जे ने करून आपल्याला आपल्या व्यवसायास अधिक हातभार लागू शकतो.

३) शॉप ऍक्ट लायसेंन्स शिवाय तुम्हाला शॉपचे बँक खाते खोलता येऊ शकत नाही. आणि या महत्वाच्या बाबीमुळे व्यावसायिकास शॉप ऍक्ट लायसेंन्स काढणे अति गरजेचे आहे. याचे महत्वाचे कारण असे कि जेव्हा आपण हे प्रमाणपत्र प्राप्त करतो आपल्याला बँक खाते बँकेत खोलता येते आणि या द्वारे आपण डिजिटल पद्धतीने पैशांची घेवाण करू शकतो जे डायरेक्ट पद्धतीने आपल्याला व्यवसाच्या खात्यात जमा होतात .

४) शॉप ऍक्ट लायसेन्स हा व्यवसायाचा पुरावा म्हणून काम करते जे सरकार मान्य असते.

५) एक दोन वर्ष तुम्ही जर त्या खात्यात व्यवहार (Transaction) चांगले केले तर तुम्हाला त्याच खात्यावर सीसी लोन सुद्धा सहज मिळु शकते ज्याच्या साहाय्याने तुम्हाला व्यवसाय वाढवण्यास मदत होईल.

६) शॉप ऍक्ट लायसेंन्स च्या मदतीने आपण व्यावसायिक कुठल्याही सरकारी स्कीमचा फायदा घेण्यासाठी पात्र ठरतो.

७) व्यवसायाचा मालकी हक्क सांगण्यासाठी एक महत्वाचे कागदपत्र म्हणून देखील याचा उपयोग होऊ शकतो.

८) शॉप ऍक्ट लायसेन्स आपण आपल्या दुकान मध्ये लावल्यानंतर एक कायदेशीर सहमती असल्याचा पुरावा ग्राहकांना दिसतो, तसेच Legal Compliance कमी होतात.

ग्राहकांच्या गरजा ओळखून मदतीचा हातभार लावनारे एकमेव ठिकाण ETaxwala......
शॉप ऍक्ट लायसेंन्स काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

१. आधार कार्ड फोटो कॉपी.
२. पॅन कार्ड फोटो कॉपी.
३. पासपोर्ट फोटो.
४. शॉपचे नाव.
५. स्वाक्षरी.
६. मोबाइल नंबर.
७. ई-मेल आयडी.
८. शॉपचा पत्ता.

जर तुम्हाला हि तुमच्या व्यवसायाचे लायसेन्स काढायचे असेल व एक सरकारमान्य व्यवसायाची सुरुवात करून प्रमाणपत्र घ्यायचे असेल तर आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आपले शॉप ऍक्ट लायसेंन्स काढू घ्या. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कंमेंट मध्ये सांगा आणि समोर गरजू व्यक्तीस पाठवा.

2 thoughts on “व्यवसायामध्ये असणारे शॉप ऍक्ट लायसेंन्स चे काही महत्व व फायदे…..”

  1. ़शाप एक्ट आणि गुमास्ता एकच आहे का वेगवेगळे

    Reply

Leave a Comment