शॉप ऍक्ट लायसन्स म्हणजे काय?

कोणताही व्यक्ती ज्याला नवीन दुकान किंवा व्यावसायिक आस्थापना उघडण्याची इच्छा आहे, ज्याला आपला व्यवसाय महाराष्ट्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात सुरू करायचा आहे, त्याने बॉम्बे शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, 1948 अंतर्गत स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करताना व्यवसाय अधिकृत असल्याचं प्रमाणपत्र म्हणून शॉप ऍक्ट लायसन्स (गुमस्ता) होय.

कोणत्याही व्यवसायाची अधिकृत सुरुवात शॉप ऍक्ट लायसन्सने होते. हा लायसन्स मिळाल्यावर तुम्ही बँकेत दुकानाच्या नावाने Current Account काढू शकता.

जे घरातूनच आपला व्यवसाय चालवत आहेत, ज्यांचा कुठेही फिजिकल स्टोअर नाही, जे ऑनलाईन व्यवसाय करतात अशांसाठीसुध्दा शॉप ऍक्ट लायसन्स फायद्याचे आहे. प्रत्येक दुकान आणि व्यावसायिक आस्थापनाने आपला व्यवसाय सुरू केल्याच्या ३० दिवसांच्या आत हे लायसन्स काढणे गरजेचे आहे.

शॉप ऍक्ट लायसन्ससाठी लागणारे डॉक्युमेंट :

१) तुमच्या व्यवसायाच नाव
२) टाइप ऑफ बिझनेस (उदा: हॉटेल, किराणा)
३) आधार कार्ड फोटो
४) व्यवसायाचा पत्ता
५) मालकाचा पासपोर्ट साईझ फोटो
६) मोबाईल नंबर आणि इमेल आयडी
७) सहीचा फोटो

तुमच्यासाठी खास ऑफर

शॉप ऍक्ट लायसन्स तुम्हाला घरबसल्या काढून मिळेल. तुम्ही आम्हाला फक्त फोटो आणि डिटेल्स पाठवा. २४ तासात तुम्हाला हे लायसन्स काढून मिळेल. तेही फक्त ३९९ रुपयांत!!

अधिक माहितीसाठी संपर्क : 8010950380

The post शॉप ऍक्ट लायसन्स म्हणजे काय? appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment