नोकरी करताय? पूरक व्यवसायाची किंवा अतिरिक्त उत्पन्नाची गरज आहे? मार्ग सुचत नाहीय? काळजी करू नका आम्ही तुम्हाला आवडेल किंवा पटेल अशा उद्योगसंधीची आता माहिती करून देऊ.
सरकारी असो की खासगी सध्या शनिवार-रविवार अनेकांना सुट्टी असते. या दिवसाचा सदुपयोग अतिरिक्त उत्पन्नासाठी करू शकतो. बागकाम उद्योग हा अत्यंत फायदेशिर आणि आर्थिक हातभार लावणारा आहे. याशिवाय आठवड्यातून दोन दिवस योग्य नियोजनाच्या आधारे हा उद्योग सहज करू शकतो. त्यामुळे ही एक चांगला पर्यायी उद्योगसंधी आहे.
आपल्या बागेत किंवा रोपवाटिकेत किंवा घराच्या परिसरात उपलब्ध जागेत निरनिराळ्या प्रकारची झाडे, सुंदर फुले तयार करून, लोकांकडे विक्री करून पैसे कमावण्याच्या व्यवसायाला, बागकाम व्यवसाय म्हणतात. जर आपल्याला बागकाम करणे खूप आवडत असेल तर आपण विविध प्रकारची रोपे लावून विकू शकता. आपण आपल्या साप्ताहिक सुट्टी दरम्यान हे काम करू शकता. यामुळे कमी वेळेत मुख्य म्हणजे स्वतःच्या सोयीने हे काम करू शकतो.
बागकाम व्यवसाय कसा सुरू करावा?
आपण हा व्यवसाय दोन पद्धतीने सुरू करू शकतो. एक म्हणजे आपण आपल्या बागेत किंवा रोपवाटिकेत विविध प्रकारची रोपे वाढवू शकतो आणि नंतर दुकान सुरू करून तेथे विकू शकतो किंवा आपण रोपवाटिकेतूनच लोकांना थेट रोप विकू शकतो.
याशिवाय हवे असल्यास लोकांच्या घरी जाऊन तेथे बागकाम करू शकतो. त्यांना शिकवून बागकाम करण्यास तरबेज करू शकतो. यासाठी आपण मानधन आकारू शकतो.
या दोन्ही पद्धती आपल्याला उत्कृष्ट उत्पन्न मिळवून देतील. आपण लोकांना ऑनलाईन मार्गदर्शन करू शकता किंवा कार्यशाळा घेऊ शकता. बारकावे आणि पूर्वतयारी करून देऊ शकता. या सगळ्यातून आपण लोकांना चांगल्या संधी निर्माण करून देऊ शकतो आणि स्वतःही कमवू शकतो.
बागकाम व्यवसाय बाजार मागणी
असे बरेच लोक आहेत ज्यांना बागकाम करण्यास खूप आवडते. ते घराबाहेर विविध प्रकारची रोपे लावून आपले घर सजवतात. काही लोक लागवडदेखील करतात, कारण यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह खूप चांगला राहतो. असे असले तरी प्रत्येकालाच याची शास्त्रशुद्ध माहिती अथवा योग्य पद्धती माहिती नसतात. केवळ जुजबी माहितीच्या आधारे विशेषत: शहरी भागातील अनेक लोक हे करत असतात.
सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनचे महत्त्व आणि त्यासाठी झाडांचे महत्त्व लोकांना जास्त पटू लागलय त्यामुळे विविध औषधी व उपयुक्त वनस्पती, झाडे यांची लोकांकडूनच जास्त मागणी असते. ते रोपे घेण्यासाठी बाजार किंवा नर्सरीमध्ये जातात. म्हणूनच जर आपण लोकांची आवड ओळखून त्यांना उपयुक्त झाडांची रोपे किंवा त्यासंदर्भातील सेवा दिली तर आपल्याला चांगले फायदेही मिळू शकतात.
बागकाम व्यवसाय करण्यासाठी, आपल्याला प्रथम रोपवाटिका आणि दुकान सुरू करण्यासाठी जागेची आवश्यकता असेल. या व्यतिरिक्त, आपल्याला बियाणे, खते, पाणी आणि बागकामाची काही उपकरणे इत्यादींसाठीदेखील व्यवस्था करावी लागेल जे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वाढवण्यास आवश्यक आहे.
आपण हा व्यवसाय आपल्या घरापासून सुरू करू शकता, परंतु लोकांना वनस्पती विकण्यासाठी आपण बाजारपेठ क्षेत्रात किंवा जास्तीत जास्त लोक आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतील अशा ठिकाणी आपली स्वतःची नर्सरी किंवा दुकान सुरू केले पाहिजे. यामुळे आपल्या कमाईची शक्यता वाढेल.
आपण आपल्या घरातून बागकाम व्यवसाय सुरू केल्यास आपल्याला त्यासाठी कोणत्याही विशेष परवान्याची आवश्यकता भासणार नाही, परंतु जर आपण हे नर्सरी किंवा दुकानातून केले तर आपल्याला आपल्या स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल. याव्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही परवान्याची गरज नाही.
आपल्याला बागकामासाठी विविध प्रकारचे बियाणे, खते आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता असेल. यासाठी आपल्याला खूप कमी खर्च येईल. या व्यवसायात अंदाजे २ ते ५ हजार रुपये गुंतवावे लागतील. या व्यतिरिक्त आपल्याला इतर कोणतीही गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही.
हा व्यवसाय केल्यास आपण सुमारे १० ते २० हजार रुपये कमवू शकतो. आठवड्याच्या शेवटी या व्यवसायातून बरेच पैसे कमावू शकतो. आपण नोकरदार असतो सोबत यातून मिळणारे उत्पन्न हे अतिरिक्त उत्पन्न असेल. शिवाय या व्यवसायात जोखीम कमी आहे. अशाप्रकारे, आपण आपल्या शनिवार व रविवारच्या सुट्टीचा वापर करून आपल्या आवडीनुसार कार्य करून पैसे कमवू शकतो.
– टीम स्मार्ट उद्योजक
The post सुट्टीच्या दिवसात बागकाम करून कमवू शकता हजारो रुपये appeared first on स्मार्ट उद्योजक.