ठाण्यात आजपासून दोन दिवसीय ‘बिझनेस जत्रा’

‘लक्ष्यवेध’ या उद्योजक विकास संस्थेतर्फे ११ व १२ नोव्हेंबर रोजी उद्योग जत्रेचे आयोजन केले आहे. ठाण्यात टीप टीप प्लाझा येथे हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय एमएसएमइ मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच अनेक मान्यवर या सोहळ्यात उपस्थिती लावून उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.

विविध उद्योजकीय संस्था, त्यांचे सदस्य, बँकांचे अधिकारी, या मेळ्यात सहभागी होणार आहेत. तसेच महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने उद्योजक या जत्रेत सहभागी होणार आहेत. कोरोना काळापूर्वी २०१९ मध्ये या जत्रेला सुरुवात झाली होती, परंतु मध्ये दोन वर्षे ही होऊ शकली नाही, अशी माहिती आयोजक अतुल राजोळी यांनी दिली.

लघुउद्योगांसाठीच्या शासकीय योजनांचा लाभ

खास लघुउद्योजकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ लघुउद्योजकांना थेट मिळवून देण्यासाठी सरकार, उद्योजक आणि बँकादरम्यान समन्वय साधणारी सुविधा प्रणाली बिझनेस जत्रा २०२२ मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

फ्रेंचायजी संधी

बिझनेस जत्रामध्ये व्यवसाय विस्तारासाठी भागीदार शोधणाऱ्या ब्रँड्स आणि नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदार, नवउद्योजकांना एक समान व्यासपीठ उपलब्ध असेल.

‘स्मार्ट उद्योजक’ या उपक्रमाचे मॅगझीन पार्टनर आहे. ‘बिझनेस जत्रा’च्या अधिक माहितीसाठी आणि सहभागी होण्यासाठी संपर्क : ९९६९२०४५८५

The post ठाण्यात आजपासून दोन दिवसीय ‘बिझनेस जत्रा’ appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment