Information about Blogging in Marathi | ब्लॉगसाठी कल्पना आणि विषय कसे शोधावे?

Blog meaning in marathi: हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल काही टिप्स देणार आहे. ब्लॉगिंग साठी आयडिया आणि विषय कसे शोधावे हे आज आपण जाणुन घेउया. कुठलीही चांगली कल्पना येण्यासाठी अभ्यासाची गरज नसते वास्तविकता कल्पना आपल्या मनातच असते परंतु आपण ती ओळखू शकत नाही. ब्लॉगचा विषय कसा शोधावा त्यावर संशोधन कसे करावे आणि कोणत्या उद्दिष्टाचा शोध घ्यावा? हे सर्व आता आपण जाणून घेऊया.

सर्वात प्रथम आपण एका कागदावर “ब्लॉग” असे लिहू या. असे केल्याने आपण अनपेक्षित कल्पनेवर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम होऊ व आपल्या विचारांची व्याप्ती सर्व बाजूंनी पसरून जाईल. आपल्या मनामध्ये विशेष जे काही विचार येतील ते आपण कागदावर त्या शब्दाच्या बाजूला लिहावे. आपण असा विचार करू नये की आपण जे काही लिहिले आहे ते बरोबर आहे किंवा चूक आहे. आपण कुठलाही ब्लॉग बघून आपल्या मनात जे काही असेल ते आपण लिहू शकता. हे झाल्यावर “आपल्या ब्लॉगचे लक्ष्य काय आहे ?” यावर विचार करावा!!

) वाचकांवर लक्ष्य द्या:

आता आपण कल्पना करू शकता की आपल्या ब्लॉगचे टार्गेट ऑडियन्स कोण आहे? युवक: जर आपण तरुणांसाठी ब्लॉग तयार करत असाल तर तुम्हाला युवकांच्या पसंतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ते काय करतात आणि काय नाही, उदाहरणार्थ: जर तुम्ही युवकांसाठी ब्लॉग बनवत असाल तर फॅशन (कपडे, मेकप) नातेसबंध, तंत्रज्ञान अभ्यास, नोकरी इत्यादी विषय आपण निवडू शकता.

आपण वयस्कर वृद्धांसाठी ‘आरोग्याच्या टिप्स’ असा एखादा ब्लॉग तयार करू शकता. लहान मुलांसाठी आपण खेळा संबंधित ब्लॉग तयार करू शकता.

) ब्लॉग तयार कसा करावा ?

डोमेन होस्टिंग: आपण सशुल्क डोमेन आणि होस्टिंग सह देखील ब्लॉग तयार करू शकता. यासाठी आपण एखाद्या मोठ्या कंपनीच्या डोमेन चा वापर करू शकता जसे की ‘Godaddy’, ‘Big-Rock’ इत्यादी. होस्टिंग साठी, आपण ‘Hostgator’, Hosting Raja’ सारख्या कंपनी चा वापर करू शकता. नेहमी लक्षात ठेवा की डोमेन आणि होस्टिंग साठी मोठ्या कंपनीचीच निवड करावी.

वर्डप्रेस व ब्लॉगर हे काही प्लॅटफॉर्म आहेत जेथे फ्री मध्ये आपण आपल्या ब्लॉग ला होस्ट करू शकता.

) प्रमोशन

आपल्या ब्लॉगच्या प्रमोशनासाठी आपण फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा वापर करू शकता. तुम्ही फेसबुक वर ब्लॉगचा फॅन पेज तयार करू शकता. ज्यामुळे अधिकाधिक लोक आपले ब्लॉग वाचू लागतील. याबरोबरच आपण ट्विटर, इन्स्टाग्राम चा दखील वापर करू शकता.

) संशोधन

सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संशोधन करण्यासाठी आपण एका चांगल्या पुस्तकांची निवड करावी. किंवा आपल्या मित्रांसोबत चर्चा करून किंवा एखाद्या व्यवसायावर लेख लिहू शकता आणि आपल्या कल्पनेत बदल करू शकता.

) उत्पन्नही सर्वात महत्त्वाची बाब आहे.

जाहिरातीमुळे आपण आपल्या ब्लॉगवरून मिळकत मिळवू शकता. काही प्रसिद्ध कंपन्यांचे ही जाहिरात देऊन आपण पैसे कमवू शकता. जसं की ‘Gogle Adsens’,’info Link’, ‘Media net’ अशा काही प्रसिद्ध कंपन्या आहेत.

डायरेक्ट प्रमोशन : आपण कोणतेही उत्पादन किंवा कोणत्याही साइटला प्रोत्साहन देऊन पैसे कमावू शकता.

अफिलिएट मार्केटिंग: आपण आपल्या ब्लॉगच्या रेफरल माध्यमांतून सुद्धा पैसे कमवू शकता. अमेझॉन, स्नॅपडिल सारख्या कंपन्या आपल्या ब्लॉगवर रेफरल लिंक द्वारे आलेल्या उत्पादनातून काही टक्के ते ब्लॉग ओनर ला देतात.

) प्रारंभ

जेव्हा आपण आपल्या ब्लॉगसाठी विषय निवडाल तेव्हा ब्लॉगसाठी खालील गोष्टी लक्षात घ्याव्या

  • नाव: आपल्या ब्लोग ला साजेसे असे एक नाव द्या.
  • लोगो: आपण आपल्या ब्लॉगसाठी एक छान दिसणारा लोगो बनवू शकता.
  • बजेट
  • ब्लॉगची रचना

All the best

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

2 thoughts on “Information about Blogging in Marathi | ब्लॉगसाठी कल्पना आणि विषय कसे शोधावे?”

Leave a Comment